marbat e sakal
नागपूर

VIDEO : कोरोनाले घेऊन...जाय...गे मारबत..., फक्त नागपुरात साजरा होणारा मारबत उत्सव

केवल जीवनतारे

नागपूर : जगाच्या पाठीवर मारबत उत्सव (Nagpur marbat festival) नागपुरात साजरा होत असून हळूहळू दीडशे वर्षाकडे या उत्सवाची वाटचाल सुरू आहे. एकाच दिवशी काळी आणि पिवळी अशा दोन्ही दोन्ही मारबती एकाचवेळी निघतात. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच तान्ह्या पोळ्याच्या दिवशी हा मारबत उत्सव (corona effect on marbat celebration) साजरा करतात. पण, यंदा मात्र या उत्सवावर कोरोनाचं सावट आहे. तरीही खंड पडू न देता कमी लोकांमध्ये हा उत्सव साजरा केला जाणार आहे. या मारबतीकडे ‘कोरोना... घेऊन जाय गे...मारबत’ असे मागणे मागण्यात येत आहे. चला तर जाणून घेऊया या उत्सवाचं (importance of marbat celebration) महत्व...

देश गुलाम असताना इंग्रजी राजवटीने जनता त्रस्त होती. सर्वत्र इंग्रजाचा अन्याय, अत्याचार सुरू होता. परकीयांच्या गुलामगिरीचे पाश तुटावेत व भारत देश स्वतंत्र व्हावा, अशा देशभक्तीच्या भावनेने प्रेरित होऊन जागनाथ बुधवारीतून तऱ्हाणे तेली समाजबांधवांनी पिवळी मारबत उत्सव कमिटीची स्थापना करीत हा उत्सव सुरू केला. काळ्या मारबतीला १४० वर्षांचा, तर पिवळ्या मारबतीला १३६ वर्षांचा इतिहास आहे. स्वातंत्र्यानंतर मात्र समाजातील अनिष्ट प्रथांचे उच्चाटन करण्याचा मारबत उत्सवाने स्वीकारला आहे. तान्हा पोळ्याच्या दिवशी हा उत्सव उपराजधानीत साजरा करण्यात येतो.

मारबतीची मिरवणूक संपूर्ण भारतात केवळ नागपुरात काढली जाते. स्वातंत्र्यापूर्वी इंग्रज राजवटीविरोधात गुप्त बैठका घेण्यापासून तर सत्याग्रह करण्यापर्यंतची माहिती पुरवण्यासाठी या उत्सवाची तयार सहा महिन्यांपासूनच सुरू करण्यात येत होती. पुढे स्वतंत्र विदर्भाचे गाजर दाखवणारे नेते, दहशतवाद, अतिरेकी कारवाया तसेच भ्रष्टाचारी नेत्यांचे बडगे तयार करून त्यांची मिरवणूक काढण्याची परंपरा सुरू झाली. मात्र काळी आणि पिवळी मारबत आणि बडगे यांच्या मिरवणुकीच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय स्थितीवर यथार्थ टीका केली जाते.

असा आहे मारबतीचा इतिहास -

काळ्या मारबतीला १४० वर्षांचा, तर पिवळ्या मारबतीला १३६ वर्षाचा इतिहास आहे. इंग्रजी राजवटीत जनता त्रस्त होती. परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी तसेच देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी सत्याग्रहींच्या गुप्त बैठकांसाठी १८८५ मध्ये जागनाथ बुधवारी परिसरात तेली समाज बांधवांनी पिवळी मारबत उत्सव कमिटीची स्थापना केली. त्यावेळी दिवंगत आप्पाजी व बटानजी भाऊ खोपडे यांनी बांबुच्या कमच्या व कागद लावून ३ ते ४ फूट उंचीची बाहुलीसारखी मारबत तयार करून लोकांच्या मदतीने शहरात तिची मिरवणूक काढली. नाईक तलावात तिचे विसर्जन करण्यात आले. तर १९१३-१४ मध्ये लक्ष्मणराव व रामाजी खोपडे यांनी गणपतराव शेंडे यांच्याकडून २० फूट उंचीची बैठकी पिवळी मारबत तयार करून घेतली. त्यानंतर समाजातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन मारबतीचा उत्सव सुरू केला. गजानन शेंडे हे पिवळी मारबत बनवण्याचे काम अविरत उत्साहाने करीत होते. यानंतर भिमाजी शेंडे व नातू गणपत शेंडे यांनी पिवळी मारबत तयार करण्याचे काम केले.

पिवळ्या मारबतीसोबतच काळ्या मारबतीलाही ऐतिहासिक पाश्र्वभूमी आहे. श्री देवस्थान पंच कमेटीतर्फे गेल्या १४० वर्षांपासून इतवारी स्थित नेहरू पुतळ्यापासून काळ्या मारबतीची मिरवणूक काढली जाते. सुरुवातीला आप्पाजी मराठे काळ्या मारबतीचा उत्सव साजरा करीत असत. स्वातंत्र्यपूर्व काळात जुलमी इंग्रजांच्या कारवायांमुळे जनता त्रस्त होती. बाकाबाईने इंग्रजांशी हातमिळवणी केली. त्याचा निषेध करण्यासाठी १८८१ पासून ही काळी मारबत काढण्यात आली होती. नेहरू पुतळ्याशेजारच्या हनुमान मंदिरात काळी मारबत तयार करण्याचे काम सुरू आहे. मंडळाचे सचिव सुरेश हरडे यांनी पुढे हे काम सुरू ठेवले. १९४२ मध्ये मारबतीच्या शुभारंभाला इतवारीत दंगल झाली होती. ५ लोक पोलिसांच्या गोळीबारात ठार झाले होते. तरीही मारबतीची मिरवणूक नित्याप्रमाणे पार पडली. काळ्या मारबतीचे विसर्जन हरिहर मंदिरासमोर असलेल्या रामकृष्ण फ्लोअर मिलसमोर केले जाते.

शहिद चौकात गळाभेट -

काळी व पिवळी मारबत शहीद चौकात एकत्र आल्यानंतर खऱ्या मिरवणुकीला प्रारंभ होतो. येथे दोन्ही मारबतींची गळाभेट होते. गळा भेटीनंतर बडकस चौक, महाल गांधीगेट, गांजाखेत मार्गे नाईकतलाव येथे त्यांचे विसर्जन केले जाते. कोरोनामुळे मागीलवर्षी मारबत उत्सव साजरा करता आला नाही. परंतु, यावर्षी या उत्सवाची तयारी सुरू करण्यात आली आहे. नागपूरसह विदर्भाच्या अनेक भागातील लोक मारबतीची मिरवणूक पाहायला येतात. या उत्सवाला मिळणारा नागरिकांचा प्रतिसाद काळाच्या ओघात कमी झाला असला तरी उत्साह मात्र कमी झालेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्रच नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

SCROLL FOR NEXT