nagpur sakal
नागपूर

Devendra Fadnavis: ‘पनवती’ कोण ते कळलं, देवेंद्र फडणविसांचा कॉंग्रेसला टोला; नागपुरात भाजपचा जल्लोष

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : तिन्ही राज्यातील निकालात भाजपला अभूतपूर्व यश मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीबांसाठी राबविलेल्या योजना व देशाला विकासाच्या मार्गावर आणल्याचा हा विजय आहे. जनतेच्या मनात भाजपच असल्याचे या निकालाने सिद्ध केले असून ‘इंडिया’ आघाडीला नाकारले, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमुद केले. आता खरी पनवती कोण, हेही आता कॉंग्रेसला कळले असेलच, त्यामुळे ते आता पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल अपशब्द वापरणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

नागपुरात त्यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानी उपमुख्यमंत्री फडणवीस प्रसारमाध्यमासोबत बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. चार राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मतांच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. तेलंगणातही पक्षाचा मोठा उदय झाला. या निवडणुकीत भाजपने ६३९ पैकी ३३९ जागा जिंकल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीतही भाजपला मोठे यश मिळेल, असा दावा त्यांनी केला.

नरेंद्र मोदी यांनी केलेला विकास हा ‘लाँग लास्टिंग’ आहे तर काँग्रेस नेते राहुल गांधी हे केवळ एखाद्या ‘इव्हेंट’ सारखे काम करीत असल्याची टीकाही त्यांनी केली. लोकसभा निवडणुकीत कुणाला मते द्यायचे याबाबत जनतेची मानसिकता निश्चित झाली आहे. परंतु या निकालाचा सकारात्मक परिणाम होईल. भाजपने सुरुवातीपासूनच केवळ विकासाच्या मुद्द्यावर प्रचार केला. मध्यप्रदेशात तर तेथील सरकारने ज्या योजना राबवल्या त्यातून आनंदीत झालेल्या मतदारांनी भाजपला कौल दिला तर छत्तीसगडमध्ये तेथील मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या भ्रष्टाचारी कार्यकाळाला जनता कंटाळली होती. येथील जनतेने मोदींवर विश्वास दाखवला, असेही ते म्हणाले. तेलंगनात मताधिक्क वाढले असून लोकसभा निवडणुकीत तेथे २० जागा जिंकू, असा दावा त्यांनी केला. ‘इंडिया’ आता ईव्हीएमवर खापर फोडणार, असा टोलाही त्यांनी लगावला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambegaon Shirur Assembly election : दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात उमेदवार कोण?

Latest Maharashtra News Updates : कोल्हापूरला परतीच्या पावसाने झोडपले

IND vs NZ 1st Test : नशीबानं थट्टा अशी मांडली...! Rohit Sharma ची विचित्र विकेट पडली, कॅप्टनलाही विश्वास बसेना

Diwali Dos and Don'ts: दिवाळीला कोणत्या गोष्टी कराव्या अन् कोणत्या नाही, वाचा एका क्लिकवर

Manini De : छोट्या पडद्यावर परतणार मानिनी डे; झी टीव्हीवरील मालिकेत साकारणार 'ही' महत्वाची भूमिका

SCROLL FOR NEXT