राज्याच्या उपराजधानीत हिवाळ्यात प्रदूषणात पुन्हा वाढ झाली आहे. ऑक्टोबरपेक्षा नोव्हेंबरमध्ये दिवाळीचे फटाके आणि इतर अनेक घटकांमुळे येथे प्रदूषणात पुन्हा वाढ झाल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीवरून उघडकीस आले आहे. शहरातील सिव्हिल लाइन्स, महाल, अंबाझरी आणि रामनगर या ठिकाणी सतत वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्र आहेत. त्या चारही केंद्राची केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेली आकडेवारी नागरिकांना धडकी भरविणारी आहे.
नोव्हेंबर महिन्यातील संपूर्ण तीसही दिवस शहरातील चारही विभाग प्रदूषित होते. या प्रदूषकामध्ये सूक्ष्म धूळकण २.५ चे प्रमाण अधिक आहे. हे आरोग्यासाठी धोकादायक आहे, अशी माहिती पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.
हवा गुणवत्ता निर्देशांक काढण्यासाठी कमीत कमी तीन तर जास्तीत जास्त आठ प्रदूषकांना प्रमाण मानले जाते. त्यात धूळकण २.५, १० ओझोन,
प्रदूषण निर्देशांक कसा ठरतो
०-५० : आरोग्यासाठी चांगला
५१-१०० समाधानकारक
१०१-२०० सर्वसाधारण प्रदूषित श्रेणी
२०१-३०० जास्त प्रदूषित
३०१-४०० अति प्रदूषित
४०१-५०० अतिशय धोकादायक
कारणे कोणती?
वाहनांची वाढती संख्या, त्यातून निघणारा धूर, रस्त्यावरील धूळ, कचरा जाळणे, बांधकाम आणि स्थानिक उद्योग आदी अनेक कारणांमुळे अलीकडे सर्वत्र प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. त्यातून आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. प्रत्येक शहरात अलीकडे विविध विकासकामे, रस्ते बांधणे सुरू आहे. त्यातच वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यातून मोठ्या प्रमाणावर धूळ आणि धूर बाहेर पडतो. बहुतेक शहरात सुद्धा अशाच समस्या निर्माण होत असल्याने प्रदूषणात सतत वाढ होत असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारी वरून लक्षात येते.
प्रदूषणामुळे रोगराईत वाढ
हिवाळ्यात दरवर्षी प्रदूषण वाढते. थंडीमुळे आणि संथ वाऱ्यामुळे प्रदूषके वाहून न जाता एकाच ठिकाणी जमिनीवर स्थिर होतात. पूर्वी हिवाळा आरोग्यासाठी चांगला मानला जात असे परंतु, अलीकडे प्रदूषणामुळे तो धोकादायक ठरत आहे. प्रदूषणामुळे श्वसनाच्या रुग्णांना त्रास होतो. तसेच नव्याने श्वसनाचे रोग वाढू शकतात. दमा, ब्रॉकायटिस, टीबी, हृदयरोग आणि मानसिक रोगही प्रदूषणामुळे वाढतात.
प्रदूषण नियंत्रित कसे होणार?
अलीकडे औद्योगिक क्षेत्रात सर्वाधिक प्रदूषण असले तरी महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यात प्रदूषण वाढले आहे. हे प्रदूषण नियंत्रित ठेवण्यासाठी वृक्षसंख्येत वाढ करणे, शहरात सार्वजनिक वाहने व सायकलचा उपयोग वाढविणे, वाहनांच्या संख्येत घट करणे, कचरा न जाळणे, उद्योगातील प्रदूषण रोखणे, नागरिकांनी सुद्धा प्रदूषण होऊ नये अशा उपाययोजना करणे आवश्यक आहे. प्रशासनाने अनेक उपाययोजना राबविण्या तरच प्रदूषणावर नियंत्रण येऊ शकेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.