नागपूर

Summer Vacation Train: उन्हाळ्याच्या सुटीत गावी जाणाऱ्यांसाठी रेल्वेची भेट! 'या' विशेष रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यात वाढ

उन्हाळ्याच्या सुट्‍यांमध्ये होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष रेल्वे गाड्यांच्या सेवेचा विस्तार केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Indian Railway Summer Vacation Special Trains: उन्हाळ्याच्या सुट्‍यांमध्ये होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष रेल्वे गाड्यांच्या सेवेचा विस्तार केला आहे. त्यामुळे नागपूर-मुंबई व नागपूर-पुणे मार्गावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांना त्याचा फायदा होईल.

सध्या फेब्रुवारी महिना संपण्यासाठी अगदी थोडे दिवस बाकी आहेत. त्यानंतर येणारा मार्च महिना संपला की, अनेकांना उन्हाळ्याची सुट्टी मिळते. त्यामुळे मोठ्या संख्येने लोक भटकंती करून आपापल्या घरी जाण्याचे बेत आखतात.

यादरम्यान ट्रेनमध्ये अचानक गर्दी वाढते. उन्हाळ्याच्या सुटीत प्रवाशांची होणारी गर्दी पाहता मध्य रेल्वेने काही रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यात वाढ केली आहे. त्यामध्ये नागपूर-मुंबई व नागपूर-पुणे मार्गावरील रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. या रेल्वे गाड्या अप व डाऊन मार्गावर अकोला रेल्वे स्टेशनवर थांबत असल्याने त्याचा स्थानिक प्रवाशांना फायदा होईल. रेल्वेने या गाड्यांची आरक्षण सुविधा सुद्धा सुरु केली आहे. (Latest Marathi News)

या गाड्यांच्या फेऱ्यात वाढ
- रेल्वे गाडी क्रमांक ०२१३९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- नागपूर द्वि-साप्ताहिक विशेष गाडी आता ३० मे २०२४ (३० फेऱ्या) पर्यंत वाढविण्यात आली आहे.
- रेल्वे गाडी क्रमांक ०२१४० नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस द्वि-साप्ताहिक विशेष गाडी आता १ जून २०२४ (३० फेऱ्या) पर्यंत वाढविण्यात आली आहे.
- रेल्वे गाडी क्रमांक ०२१४४ नागपूर-पुणे साप्ताहिक विशेष गाडी आता ३० मे २०२४ (१५ फेऱ्या) पर्यंत वाढविण्यात येत आहे.
- रेल्वे गाडी क्रमांक ०२१४३ पुणे-नागपूर साप्ताहिक विशेष गाडी आता ३१ मे २०२४ (१५ फेऱ्या) पर्यंत वाढविण्यात आली आहे.

विशेष शुल्कावर गाडी आज
मध्य रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नागपूर दरम्यान विशेष शुल्कावर अतिजलद वन वे दोन एकेरी विशेष गाड्या चालवणार आहे.

गाडी क्रमांक ०२१०३ अतिजलद एकेरी विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून १९ फेब्रुवारी रोजी रोजी रात्री १२.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १५.३२ वाजता नागपूर येथे पोहोचेल. या गाडीला अकोला रेल्वे स्टेशनवर थांबा देण्यात आल्यामुळे त्याचा फायदा स्थानिक प्रवाशांना होईल.

महाराष्ट्र एक्सप्रेस शॉर्ट टर्मिनेट
पुणे आणि मिरज विभागातील तारगाव, मसुर आणि सिरवडे स्थानकांदरम्यान दुहेरीकरण सुरू करण्यासाठी प्री-नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक परिचालीत करण्यात येणार आहे. (Latest Marathi News)

त्यानुसार गाडी क्रमांक ११०४० गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस २१ फेब्रुवारी रोजी पुणे स्थानकांवर शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल. गाडी पुणे ते कोल्हापूर दरम्यान रद्द राहील. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ११०३९ कोल्हापूर -गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस २२ फेब्रुवारी रोजी पुणे स्थानकांवरून नियोजित वेळेत सुटेल. गाडी कोल्हापूर ते पुणे दरम्यान रद्द राहील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह'प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT