नागपूर : अखिल भारतीय व्याघ्रगणनेचा बहुप्रतीक्षित व्याघ्र प्रकल्प आणि राज्यनिहाय वाघांची संख्या आज (ता. २९) जाहीर होण्याची शक्यता असून महाराष्ट्रात एकूण ४४५ वाघ असण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये आज (ता. २९) आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाचे आयोजित केले आहे. त्यात राज्यनिहाय व्याघ्रगणना जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झालेले ३९० वाघ आहे.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई भवानी अभयारण्यातील वाघांची संख्या मोजलेली नाही. इतर प्रादेशिक क्षेत्रातील वाघांच्या समावेशासह राज्यातील वाघांची संख्या ४४५ पर्यंत जाण्याची शक्यता आहे.
२९ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्याघ्र प्रकल्पाला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशातील वाघांच्या संख्येवरील ‘स्टेटस ऑफ टायगर्स-२०२२’ सारांश अहवाल प्रसिद्ध केला. २०२२ च्या सर्वेक्षणानुसार, भारताच्या ५३ व्याघ्र प्रकल्पांमध्ये अंदाजे ३,१६७ वाघांची नोंद झालेली आहे. २०१८ च्या २,९६७ च्या अंदाजापेक्षा हे वाघ सुमारे २०० ने अधिक आहेत.
२९ जुलैला भारतीय वन्यजीव संस्था, राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण आणि केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वैयक्तिक व्याघ्र प्रकल्पांचा अहवाल जाहीर होण्याची माहिती आहे. त्यात वाघांची संख्या वाढण्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे.
शिकारीने वाढवली भीती
भारतीय वन्यजीव संस्थेने २०२२ च्या अहवालात मध्य भारत भूप्रदेशात १,१६१ वाघ असल्याचे जाहीर केलेले आहे. जगातील ७५ टक्के वाघ भारतात आहेत. मध्य भारत भूप्रदेशात महाराष्ट्रात ४४५ वाघांसह मोलाचे योगदान राहण्याची शक्यता आहे.
मात्र, आसाममध्ये पकडलेल्या शिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांनी गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची शिकार केल्याचे कबूल केले आहे, त्यामुळे ती आकडेवारी कमीही होऊ शकते.
वाघांची संख्या
राखीव क्षेत्र
ताडोबा- ८१-८७
उमरेड-कऱ्हांडला- ०६
नवेगाव-नागझिरा -१२-१७
पेंच -४१-४५
बोर- ९- १४
मेळघाट -५५-६१
टिपेश्वर १२-२०
सह्याद्री --०६
पैनगंगा- ०२
कन्हारगाव ब्लॉक- १३-२३
प्रकल्पाबाहेर
ब्रह्मपुरी -५५- ६६
पांढरकवडा -१३-१९
मध्य चांदा -१०
वरोरा-भद्रावती- १३
राजुरा ब्लॉक- २
जुनोना ब्लॉक- २५-४२
बावनथडी ब्लॉक- १४-२४
गडचिरोली -२७
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.