High Court  sakal
नागपूर

High Court : ग्रीन जिमला १३ कोटी रुपये कसे मंजूर केले? उच्च न्यायालय : खनिज विकास निधीचा गैरवापर केल्याचा दावा

Green GYM : खनिज विकास निधीतून ग्रीन जिमसाठी १३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाने या निर्णयाबद्दल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जिल्ह्यातील दोनशे गावांमध्ये ग्रीन जिम उभारण्यासाठी खनिज क्षेत्र कल्याण निधीतून १३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. हा निधी कशाच्या आधारावर मंजूर करण्यात आला, यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य शासनाला चार आठवड्यांमध्ये उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. वैभव जगताप यांनी ॲड. शशिभूषण वहाणे यांच्यामार्फत ही जनहित याचिका दाखल केली आहे.

या प्रकरणावर न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या समक्ष सुनावणी झाली. याचिकेनुसार, पंतप्रधान खनिज क्षेत्र कल्याण योजनेंतर्गत कौशल्य विकासासाठी रामटेक, उमरेड, कुही, भिवापूर, कामठी, मौदा, नागपूर ग्रामीण, पारशिवनी, सावनेर, नरखेड आणि कळमेश्वर तालुक्यातील २०० गावांमध्ये ग्रीन जिम मंजूर करण्यात आल्या आहे. खनिज क्षेत्र कल्याण निधीचा वापर खाण प्रभावित भागात आरोग्य सेवेसाठी केला जावा.

या योजनेचा निधी पाणीपुरवठा, पर्यावरण संरक्षण, प्रदूषण नियंत्रण, शिक्षण, महिला, बालके व वृद्ध यांच्या कल्याणासाठीच्या योजना, खाणकामग्रस्त भागात कौशल्य विकास, स्वच्छता आदी कामांसाठी खर्च करणे अपेक्षित आहे. मात्र, १३ कोटींचा निधी केवळ ग्रीन जिमसाठी मंजूर करण्यात आला. हे अयोग्य आहे. त्यामुळे, ग्रीन जिमला निधी देण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. पुढील सुनावणी २० नोव्हेंबर रोजी निश्‍चित करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: दहावी-बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर ते पुढचा मुख्यमंत्री देशमुखांच्या घरातलाच?

दहावी-बारावी बोर्डाचे ठरलं वेळापत्रक! यंदा परीक्षेचे सीसीटीव्हीत होणार रेकॉर्डिंग; निकालापर्यंत फुटेज साठविण्याचे केंद्रांना बंधन; केंद्रांवरील सुविधांची १५ डिसेंबरपर्यंत पडताळणी

Panchang 22 November: आजच्या दिवशी शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 22 नोव्हेंबर 2024

आजचे राशिभविष्य - 22th नोव्हेंबर 2024

SCROLL FOR NEXT