ITMS system Connect with software to prevent accidents on samruddhi Highway sakal
नागपूर

Samruddhi Highway : ‘समृद्धी महामार्गावर अपघात रोखण्यासाठी ‘आयटीएमएस’ सिस्टीम

अपघाताला आळा घालण्यासाठी शासनाचे प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

- अखिलेश गणवीर

नागपूर : समृद्धी महामार्गावर अपघात रोखण्यासाठी अत्याधुनिक इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) लावण्याच्या हालचाली शासनाने सुरू केल्या आहेत. यामुळे महामार्गावरील सर्व हालचाली सॉफ्टेवअरशी कनेक्ट राहणार आहेत.

आयटीएमएसचा उपयोग हा मुख्यतः माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून वाहतूक व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण, वाहतूक कायद्याची अंमलबजावणी आणि वाहतूक सुरळीत करण्याकरिता होतो.

यामुळे वाहनधारकांना महामार्गावर रस्त्यासंबंधी वेळोवेळी माहिती मिळणार आहे. रस्त्यावरील वळण, लेन, वाहनांची गती आदी माहिती त्यात समाविष्ट राहणार आहे. वाहतूक सुरक्षित करणे आणि वाहनधारकांमध्ये विश्वासार्हता निर्माण करण्याचा प्रयत्न यामाध्यमातून होणार आहे.

ही सर्व यंत्रणा सॉफ्टवेअरने कनेक्ट असून महामार्गावर देखरेख ठेवणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना रस्त्यावरील हालचालीची माहिती मिळून धोका टाळण्यासाठी सूचना करण्यास मदत होणार आहे. राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी नागपूर भेटीत ‘आयटीएमएस’ यंत्रणेला दुजोरा दिला आहे.

अशी करणार ही यंत्रणा काम

- गती शोध प्रणालीने वाहनांची तपासणी

- लेन शिस्त उल्लंघन यंत्रणा लावणार

- कॅमेऱ्यातून प्रत्येक वाहनाचा शोध घेतला जाईल

- रस्त्यावरील सिग्नलचे उल्लंघन झाल्यास कळेल

- वेग मर्यादा ओलांडल्यास त्वरित कारवाई

- वाहनांच्या नंबर प्लेट लगेच शोधल्या जाणार

- रस्त्यावरील सूचनांची ठिकठिकाणी माहिती

- पब्लिक अड्रेस सिस्टीममध्ये रस्त्याविषयी माहिती देणार

- आपत्कालीन सेवा प्रणाली, वेगनियंत्रण चिन्हे

- वाहनचालकांसाठी संवाद प्रणाली यंत्रणा

- संपूर्ण मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याने पाळत

- वाहन चालकांचा चेहरा ओळखण्यात येईल

अशी करणार यंत्रणा काम

  • गती शोध प्रणालीने वाहनांची तपासणी

  • लेन शिस्त उल्लंघन यंत्रणा लावणार

  • कॅमेऱ्यातून प्रत्येक वाहनाचा शोध घेतला जाईल

  • रस्त्यावरील सिग्नलचे उल्लंघन झाल्यास कळेल

  • वेग मर्यादा ओलांडल्यास त्वरित कारवाई

  • वाहनांच्या नंबर प्लेट लगेच शोधल्या जाणार

  • रस्त्यावरील सूचनांची ठिकठिकाणी माहिती

  • पब्लिक अड्रेस सिस्टीममध्ये रस्त्याविषयी माहिती देणार

  • आपत्कालीन सेवा प्रणाली, वेगनियंत्रण चिन्हे

  • वाहनचालकांसाठी संवाद प्रणाली यंत्रणा

  • संपूर्ण मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याने पाळत

  • वाहन चालकांचा चेहरा ओळखण्यात येईल

कोरियन कंपनीसोबत करार

समृद्धीवर ‘आयटीएमएस’ यंत्रणा लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आणि कोरियन कंपनीसोबत जवळपास हजार कोटीचा करार होणार असल्याची माहिती आहे. याबाबत हालचालींना वेग आला आहे. येत्या काळात करार होऊन ही यंत्रणा लागणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

समृद्धी महामार्गावर आयटीएमएस यंत्रणा लावण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याकरिता एमएसआरडीसीचे कोरियन कंपनीशी करार करण्याचे सुरू आहे. त्याचा कालावधी अद्याप निश्चित ठरला नाही.

— राजाभाऊ गिते, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज्यात मतमोजणीला सुरवात

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT