Itwari-Tatanagar Express cancelled for six days along with 10 other mail railway administration
Itwari-Tatanagar Express cancelled for six days along with 10 other mail railway administration Sakal
नागपूर

Itwari Tatanagar Express : इतवारी-टाटानगर एक्स्प्रेस सहा दिवस रद्द; 6 रेल्वेगाड्यांच्या मार्गात बदल

सकाळ वृत्तसेवा

Nagpur News : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या बिलासपूर विभागातील कोतरलिया रेल्वे स्टेशनला नॅशनल थर्मल पॉवर कॉपोर्रेशन तलाईपल्ली माईन्स लाइनशी जोडण्याचे काम करण्यात येणार आहे. यासाठी मार्ग ब्लॉक करण्यात येणार असून नेताजी सुभाषचंद्र बोस (इतवारी)-टाटानगर-नेताजी सुभाषचंद्र बोस (इतवारी) एक्स्प्रेस सहा दिवस रद्द करण्यात आली आहे.

यासह नागपूरमार्गे धावणाऱ्या सहा गाड्यासह एकूण १० रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस (इतवारी)-टाटानगर एक्स्प्रेस आणि १८१०९ टाटानगर-नेताजी सुभाषचंद्र बोस (इतवारी) एक्स्प्रेस २५ ते ३० जूनदरम्यान धावणार नाही.

यासह नागपूरमार्गे धावणारी संतरागाछी-पुणे हमसफर एक्स्प्रेस २९ जूनला आणि पुणे-संतरागाछी हमसफर एक्स्प्रेस १ जुलैला रद्द करण्यात आली आहे. हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस २५ ते ३० जून आणि पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस २७ जून ते २ जुलै दरम्यान, एलटीटी-शालीमाल एक्स्प्रेस २४, २५, २८ व २९ जून आणि शालीमार-एलटीटी एक्स्प्रेस २६, २७, ३० जून व १ जुलैला रद्द करण्यात आली आहे.

संतरागाछी-जबलपूर एक्स्प्रेस २६ जूनला, जबलपूर-संतरागाछी एक्स्प्रेस २७ जूनला, सिकंदराबाद-दरभंगा एक्स्प्रेस २५ व २९ जूनला आणि दरभंगा-सिकंदराबा एक्स्प्रेस २८ जून व २ जुलैला धावणार नाही. यासह गोंदिया-झारसुगुडा-गोंदिया मेमू पॅसेंजर बिलासपूर ते झारसुगुडा दरम्यान धावणार नाही.

सहा रेल्वेगाड्यांच्या मार्गात बदल

रेल्वेने प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, २४ ते २९ जून दरम्यान हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेस आणि २६ जून ते १ जुलै दरम्यान मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस, २६ व २७ जूनला पोरबंदर-शालीमार एक्स्प्रेस आणि २८ व २९ जूनला शालीमार-पोरबंदर एक्स्प्रेस, २४ व २८ जूनला हटिया-पुणे एक्स्प्रेस आणि २६ व ३० जूनला पुणे-हटिया एक्स्प्रेसच्या मार्गात बदल करण्यात आले आहे. सहाही रेल्वेगाड्या झारसुगुडा-टिटलागड-रायपूरमार्गे धावणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur violence: "1993 मध्येही असाच हिंसाचार झाला होता, तेल ओतणाऱ्यांनी शांत बसा...."; PM नरेंद्र मोदी मणिपूरवर राज्यसभेत बोलले!

T20 World Cup: फायनलपूर्वी कॅप्टन रोहितने भारतीय संघाला काय सांगितलं होतं? सूर्याने केला खुलासा

ICC T20I Ranking: हार्दिक पांड्याने रचला इतिहास! रँकिंगमध्ये नंबर वनचा ताज पटकावणारा ठरला पहिलाच भारतीय

Pandharpur Wari : उरुळी कांचनमध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीचा नगारा रोखला; घटनास्थळी पुणे पोलिस अधीक्षक दाखल

Amol Kolhe: कधी कल्पनाही केली नव्हती, साहेबांमुळे शक्य झालं; पक्षाने मोठी जबाबदारी दिल्याने कोल्हे भावूक

SCROLL FOR NEXT