krushna janmasthami  sakal
नागपूर

Janmashtami Festivity : जन्माष्टमीसाठी कान्हा ड्रेस, प्रिंटेट धोतरची क्रेझ

हे लक्षात घेता विशेष पॅकेज उपलब्ध आहे. २०० ते ६०० रुपयांपर्यंत पोशाखांचे दर आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त शहरातील बाजारपेठ सज्ज झालेली आहे. बालगोपालांसह कान्हाच्या श्रृंगारासाठी विशेष प्रकारचे पोशाख, फेटे, बासरी आणि झोपाळे आले असून ते आकर्षणाचे केंद्र ठरू लागले आहेत. मुलांना श्रीकृष्णाच्या रूपात तर मुलींना राधाच्या रूपात सजविण्याची ‘क्रेझ''ही दिवसेंदिवस वाढू लागली आहे.

हे लक्षात घेता विशेष पॅकेज उपलब्ध आहे. २०० ते ६०० रुपयांपर्यंत पोशाखांचे दर आहेत.

शहरातील विविध बाजारपेठेतील दुकानांमध्ये यावेळी श्रीकृष्णासाठी फेट्यामध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पूर्वी केवळ पिवळा आणि नारंगी रंगाचे फेटे येत होते. यावेळी मात्र हिरवा, निळा, आसमानी आणि जांभळा रंगातही फेटे बाजारात विक्रीसाठी आलेले आहेत.

तसेच धोतर, पट्टा, कंबरपट्टा, कानातील कुंडल, मोत्यांच्या हारालाही मागणीही वाढलेली आहे. या वस्तूंची किंमत ५० ते २५० रुपयांपर्यंत आहे.

व्यवसायी विजय गुगलानी म्हणाले की, यावेळी जन्माष्टमीकरिता कान्हाचे विशेष पोशाख तयार केलेले आहेत. नागपुरात पोशाख तयार करणाऱ्यांचे पाच कारखाने आहेत. तसेच दिल्ली आणि मथुरा येथूनही कान्हाचे ड्रेस येतात.

जन्माष्टमीच्या निमित्ताने बाजारात मोठी उलाढाल होते. शाळांमध्ये मुलांना बालकृष्णाच्या पोशाख परिधान करून बोलविण्यात येते. त्यामुळेच बाजारात या ड्रेसची क्रेझ वाढली आहे. पालकांनाही आपल्या मुलांना कान्हाच्या रूपात पाहून सोशल मीडियावर शेअर करण्याकडे कल वाढलेला आहे.

त्यामुळेही बाजारात रौनक वाढलेली दिसत आहे. जन्माष्टमीनिमित्त कान्हा ड्रेसची विक्री सुरू झाली आहे. मोरपंख असणाऱ्या पोशाखाला विशेष पसंती आहे.

कृष्ण आणि राधाचे ड्रेसेस रेंटवर घेण्याचे चलन वाढलेले आहे. टीव्हीवर सुरू असलेल्या कृष्णा सिरीयलमधील प्रिंटेट धोती आणि फुलाच्या पगडीला मागणी आहे. फॅन्सी टाईपच्या ड्रेसही पसंतती उतरत आहे.

हेवी मुकुट आणि धोतराला मागणी असून त्याचे रेंट ३०० ते ३५० रुपयापर्यंत आहे. याशिवाय कृष्णाच्या केसालाही विशेष मागणी आहे. आजपासून शाळांमध्ये कृष्णाष्टमीचा माहोल सुरू झाला असून तो दहा सप्टेंबरपर्यंत चालेल.

-सुहासिनी चंद्रशेखर साहू, संचालक, लाहनीज नाट्य श्रृंगार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar यांच्यावर टीका का करत नाही? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मी विचलित...'

Latest Maharashtra News Updates : पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Sovereign Gold Bond: सरकारी योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट

Maratha Reservation: सरकारमुळेच माझ्या मुलाचा जीव गेला; आरक्षणासाठी जीव देणाऱ्या प्रतिकच्या आईचा जरांगेंसमोर टाहो

A Unique Hat trick: ऑस्ट्रेलियन फिरकीपटूची अनोखी हॅटट्रिक; ३६ वर्षांपूर्वी कर्टनी वॉल्श यांनी केली होती अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT