Jilha Parishad Nagpur sakal
नागपूर

Jilha Parishad Nagpur : विधानसभेनंतर जि.प.ची सर्कल रचना, आरक्षण?;सरकार जाहीर करणार कार्यक्रम

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीला सहा महिन्यांचा वेळ असला तरी अनेकांना निवडणुकीचे वेध लागले आहे. अनेकांनी मोर्चबांधणीस सुरुवात केली असून, सर्कल रचना व आरक्षणाकडे लक्ष लागले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीला सहा महिन्यांचा वेळ असला तरी अनेकांना निवडणुकीचे वेध लागले आहे. अनेकांनी मोर्चबांधणीस सुरुवात केली असून, सर्कल रचना व आरक्षणाकडे लक्ष लागले आहे. राजकीय लाभ, तोट्याचे गणित बघता विधानसभेनंतरच सर्कल रचना व आरक्षणेचा कार्यक्रम जाहीर होणार असल्याची चर्चा आहे.

पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा संपूर्ण भार राज्य निवडणूक आयोगाकडे होता. दरम्यानच्या काळात सरकारने आयोगाचे अधिकार कमी करीत ते आपल्याकडे घेतले. त्यामुळे आता सर्कल रचना (प्रभाग रचना) व आरक्षण जाहीर करण्याचे अधिकार शासनाकडे आहेत. परंतु शासनस्तरावर अद्याप कोणतीही हालचाल नसल्याचे सूत्रांकडून समजते.

मागील वेळी विधानसभेपूर्वी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली होती. ऑक्टोबरला विधानसभेकरिता निवडणूक होणार असून, सप्टेंबरच्या सुरुवातीलाच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषदेचे राजकारण थेट ग्रामीण भागाशी संबंधित आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सर्कल रचना व आरक्षणाचा कार्यक्रम विधानसभेपूर्वी जाहीर केल्यास त्याचा फायदा व तोट्याच्या बेरीज, वजाबाकीवरच हा कार्यक्रम अवलंबून असल्याची चर्चा होत आहे.

इच्छुकांचे लक्ष लागले सर्कल रचनेत बदल होणार आहे. आरक्षणही महत्त्वाचे आहे. सध्याचे आरक्षण राहणार की जागा महिला, मागासवर्गासाठी आरक्षित होईल, याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT