नागपूर : कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या सहकार पॅनेलने वर्चस्व कायम ठेवले. अठराही जागांवर विजय मिळवत विरोधकांचा धुव्वा उडविला. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गटाला पराभवाचा सामना करावा.
सुनील केदार प्रणीत सहकार पॅनेलचे व्यापारी मतदारसंघातील प्रकाश वाधवानी, अतुल सेनाड व हमाल मतदारसंघातून किशोर पलांदूरकर तर सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून विजय चौधरी, वसंतराव लांडगे, प्रकाश नागपुरे, अजय राऊत, बेनिराम राऊत, अहमद शेख, बाबाराव शिंदे, रवीचंद्रा नांदूरकर, अंजली शिंदे, हरिभाऊ गाडबैल, अशोक सोनवाणे तसेच ग्रामपंचायत मतदारसंघातील संजय कुंटे, दीपक राऊत, महेश चोखंद्रे, नारायण कापसे यांनी घवघवीत यश मिळविले.
विजयाबाबत केदार म्हणाले, बाजार समितीचा हा विजय सहकार क्षेत्राचा विजय आहे. १९७४ ला सहकार महर्षी बाबासाहेब केदार यांच्या पुढाकाराने बाजार समितीची स्थापना करण्यात आली. बाजार समितीमध्ये तेव्हापासूनच सामान्य शेतकरी वर्गाला न्याय देण्यासाठी सतत प्रयत्न सुरू आहेत. केंद्र शासनाने शेतकरीविरोधी कायद्याबाबत आतातरी विचार करावा. जिल्हा परिषद आणि आता बाजार समितीच्या निवडणुकांमधील निकालाने भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आला. येत्या काळात जनता भाजपला त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नसल्याचे केदार यांनी सांगितले.
यावेळी माजी मंत्री रमेश बंग, माजी आमदार विजय घोडमारे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, सदस्या भरती पाटील, ममता धोपटे, कुंदा राऊत, अवंतिका लेकुरवाळे, वृंदा नागपुरे, प्रकाश खापरे, दिनेश ढोले, हिंगणा पंचायत समिती सभापती रेखा वरठी, उपसभापती संजय चिकटे, पंचायत समिती सदस्य उज्ज्वला खडसे, प्रीती अखंड, रूपाली मनोहर, अपर्णा राऊत उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.