BJP News: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण-पश्चिम मतदार संघामध्ये सध्या अमृता फडणवीस या ॲक्शन मोडवर आहे. लाडकी बहीण मेळाव्याच्या माध्यमातून अमृता फडणवीस मतदारसंघ पिंजून काढत आहेत. शनिवारी पावनभूमी येथे झालेल्या महिला मेळाव्यात त्यांनी नाव न घेता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
अमृता फडणवीस म्हणाल्या की, राज्यात महायुती सरकारने अनेक लोकोपयोगी योजना राबवल्या आहेत. महिलांसाठी योजना आणल्यामुळे लाभार्थी महिलांना मोठा फायदा झाला. आपला महाराष्ट्र पुरोगामी कसा राहील.. तुम्ही महिला म्हणून स्वतः सोबत दुसऱ्यांसाठीसुद्धा उभ्या राहिल्या तर महाराष्ट्रा पुरोगामी राहील.
त्या पुढे म्हणाल्या की, माझं कुटुंब माझी जवाबदारी स्त्रिया म्हणू शकतात, पण माझं कुटुंबच माझी जबाबदारी असं एक मोठे नेते म्हणतात तेव्हा अडचण आहे. पण देवेंद्र फडणवीस हे असं कधीच म्हणत नाहीत. त्यांनी संपूर्ण महिला, शेतकरी, मुलांची जबाबदारी घेतली आहे. त्यासाठी ते 24 तास काम करतात त्यांच्याकडे दूरदृष्टी आहे, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
अमृता फडणवीस पुढे म्हणाल्या, कोणी असा नेता निवडणून येणार नाही ज्यांना आपले घर भरायचे आहे. ज्यांना मुलीला सीएम करायचं.. पावरमध्ये ठेवायचे असे लोक तुमच्या मदतीला येणार नाहीत. लोकांसाठी काम करुन त्यांना पुढे न्यायचं असेल तर काम करणारे उमेदवार निवडून आणा, असं आवानह करताना त्यांनी शरद पवारांवर टीका केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.