Land grabbed by blind Verma in Nagpur 
नागपूर

महिलेची घेऊन साथ, भूमाफियाने लावली वाट; दृष्टिहीन वर्मांची हडपली जमीन, इंदूर-नागपूर चकरा मारून जीव मेटाकुटीला

प्रशांत रॉय

नागपूर : मुलाबाळांना भविष्यात कामी येईल या हेतूने मित्राच्या आग्रहाखातर प्लॉट घेतला. काही वर्षांनी येऊन पाहतो तर काय प्लॉटवर एका महिलेने झोपडीवजा घर बांधलेले. तिला विचारले तर ती तोऱ्यात म्हणाली ‘याचे पैसे मी प्लॉटच्या मालकाला दिले आहेत’. मी म्हटलं, ‘अरे पण प्लॉट तर माझ्या मृत बायकोच्या नावे आहे व तुम्ही मला भेटलाही नाहीत’. तर ती उत्तरली ‘मी बक्कळ पैसे मोजून हा प्लॉट खरेदी केला आहे. बाकी मला काही माहित नाही. निघा आता’.

६५ ते ७० वर्ष असलेले अंध बन्सपती वर्मा (रा. इंदूर, मध्य प्रदेश) केविलवाण्या स्वरात सांगत होते. बन्सपती यांचे कामानिमित्त नागपूरला नेहमी येणे जाणे होते. मित्राच्या आग्रहाखातर १९८९ मध्ये गोरेवाडा परिसरात १,५०० स्क्वेअर फूट प्लॉट घेतला. सदगुरू सरन कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये ९ नंबरच्या प्लॉटची बायकोच्या नावाने रजिस्ट्रीही केली.

दरम्यान, इंदूरला स्थायिक झालो. अचानक संकटांची मालिका सुरू झाली. पत्नीचा मृत्यू झाला. या संकटातून बाहेर पडतो न पडतो तोच एक दिवस काही दिसेनासे झाले. अनेक उपचार केले परंतु लाभ झाला नाही. घरच्यांनी एका गरीब मुलीसोबत माझे दुसरे लग्न करून दिले. एक मुलगी झाली. पत्नीच रोजंदारी करून घर चालवित आहे.

मुलीच्या पुढील शिक्षणासाठी प्लॉटची विक्री करून पैसे गाठीशी जोडावे यासाठी नागपूरला आलो. एका हितचिंतकासोबत प्लॉटवर गेलो. तेव्हा तेथे एका महिला घर बांधून राहत असल्याचे समजले. तिला याबाबतीत विचारले असता तिने फटकळपणे उत्तर देत परत येथे यायचे नाही असे सांगितले. २०१२ पासून शक्य होईल तसे येथे येतो, विनंती करतो, हातपाय जोडतो मात्र सगळं व्यर्थ. 

भूमाफियांचा गनिमी कावा

उपराजधानीत भूमाफिया मोकळे असलेले प्लॉट, भूखयांवर अतिक्रमण करतात. तेथे महिलांना छोटेसे घर बांधून देत प्लॉटची परस्पर दुसऱ्यांना विक्री करतात. प्लॉटचा मालक याबाबत जाब विचारायला गेला की या महिला समोर येतात. भूमाफिया समोर येतच नाही. महिलांविषयी कायदे कठोर असल्याने पोलिसांची उगाच कटकट नको म्हणून आल्यापावली माघारी परतावे लागते. भूमाफियांचा हा गनिमी कावा समजून घेत मुळ प्लॉटधारकांना न्याय मिळावा, असे सामाजिक कार्यकर्ते मलकवाडी म्हणाले.

मात्र काहीच हाती आले नाही
मध्यस्थांच्या मार्फत बोलणीचा प्रयत्न केला. पोलिसांतही तक्रार केली. मात्र, काहीच हाती आले नाही. शासन, प्रशासनाने आम्हा गरिबांचे दुःख जाणून योग्य ती कारवाई करीत प्लॉट परत मिळवून द्यावा हीच विनंती आहे. 
- बन्सपती वर्मा,
पीडित प्लॉटधारक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेंचा पराभव निश्चित, चौदाव्या फेरी अंती तिसऱ्या स्थानी

Electronic Voting Machine : EVM मशीनवर कशी मोजली जातात मते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Atul Bhatkhalkar Won Kandivali East Assembly Election : कांदिवली पूर्व विधानसभेत बीजेपीच्या अतुल भातखळकरांची विजयी हॅट्रिक !

Maharashtra next CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? 'निकाला'नंतर तावडेंची बदलली भाषा, कोणाला दिलं विजयाचं क्रेडिट?

Kagal Assembly Election Results 2024 : मुश्रीफांनी समरजित घाटगेंचा केला टप्प्यात कार्यक्रम; कागलमध्ये लगावला 'विजयी षटकार'

SCROLL FOR NEXT