नागपूर : कोरोनामुळे राज्यात मागील वर्षीपासून न्यायालयीन कामकाज निम्म्यावर आले आहे. याचा परिणाम वकिलांच्या रोजी रोटीवर झाला आहे. विशेषत: वकिली व्यवसायामध्ये नुकतेच पदार्पण केलेल्या वकिलांना याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे, शहरातील अनेक वकील वकिली सोडून नोकरीच्या शोधात लागले आहे.
वरिष्ठ वकिलांच्या हाताखाली वकिलीचे धडे घेतल्यानंतर युवा वकील स्वतंत्रपणे आपला व्यवसाय सुरू करतात. मात्र, कोरोनाचा फटका बसल्याने शहरातील वकिलांना खोलीचे भाडे देणेही अवघड झाले आहे. तर, अनेक वकिलांचे इएमआयचे हप्ते चुकल्याने कर्जाचे ओझे सोसावे लागत आहेत. व्यवसाय करायला गेल्यास अशा परिस्थितीमध्ये कोणीही भांडवल द्यायला तयार नाही. नोकरी मागायला गेले तर 'जरा थांबा' असेच उत्तरे ऐकायला मिळत आहेत. त्यामुळे बार कौंन्सिलसह वकील संघटनांनी मदत करावी, अशी अपेक्षा वकिलांची आहे.
स्वतंत्र व्यवसाय सुरू केलेल्या वकिलांना व्यवसायामध्ये स्थिरस्तावर व्हायला किमान दहा वर्षे लागतात. दहा वर्षानंतर कमाईचे पुरेसे साधन निर्माण होतात. मात्र, वर्षभरामध्ये ओढवलेल्या परिस्थितीमुळे युवा वकील आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेक वरिष्ठ वकिलांनी कार्यालयामध्ये शिकाऊ म्हणून काम करणाऱ्या वकिलांचे मानधन देणे बंद केले आहे. अशा परिस्थितीमध्ये वकिलांच्या या बड्या बड्या संघटनांनी मदत करायला हवी.
-अॅड. अनिल कावरे
हेही वाचा - Weekend Lockdown: राज्यात दोन दिवस कडक लॉकडाउन; वर्षभरापूर्वीच्या भीषण स्थितीचा येणार...
वकिलांपुढे कोरोनासह आर्थिक संकटसुद्धा उभे राहिले आहे. वकिलांची कमाई दररोजच्या वकिलीवर अवलंबून असते. या क्षेत्रामध्ये आल्याचा कधी कधी खेद वाटतो. या काळात वकिली सोबत जोड धंदा आवश्यक झाला आहे.
गेल्या वर्षभ-अॅड. संदीप साखरे रापासून काम मिळणे बंद झाले आहे. माझे गाव नागपूर पासून ४० किमी अंतरावर आहे. मला रोज जाण्या येण्याला पैसा लागतो. या शिवाय घर खर्च वेगळा. व्यवसाय मंदावल्याने खर्चावर कात्री लागली आहे. आता मिळाल्यास सरकारी नोकरी किंवा खासगी नोकरीसाठी प्रयत्न करणार आहे.
-अॅड. अमजद पठाण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.