chandrashekhar bawankule chandrashekhar bawankule
नागपूर

उद्या फैसला : बावनकुळे की देशमुख? भोयर यांची मते ठरणार निर्णायक

एक अधिकृत दुसरा समर्थीत असे दोन उमेदवार काँग्रेसचे रिंगणात होते

राजेश चरपे

नागपूर : माजी ऊर्जामंत्री तसेच भाजपचे प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) यांच्या राजकीय अस्तित्वासाठी महत्त्वाची असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीचा (Legislative Council elections) फैसला मंगळवारी (ता. १४) होणार आहे. काँग्रेसचे दोन उमेदवार आणि मतदानाच्या आदल्या दिवशी घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे मतदार कोणाचा निकाल लावतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपचे (BJP) चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र भोयर (Ravindra Bhoyar) अशी थेट लढत होणार होती. मात्र, मतदानाच्या आदल्या दिवशी काँग्रेसने उमेदवार बदलला. अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख (Mangesh Deshmukh) यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे काँग्रेसचा (Congress) उमेदवार कोण याबाबत मतदार शेवटपर्यंत संभ्रमात होते. देशमुख आणि भोयर यांच्यामध्ये काँग्रेसचे मतविभाजन झाल्यास त्याचा थेट फायदा बावनकुळे यांना होण्याची शक्यता आहे. रिंगणात तीनच उमेदवार असल्याने निकालाबाबत चुरस आणखीच वाढली आहे.

बावनकुळे यांना उमेदवारी जाहीर होताच भाजपच्या मतदारांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले होते. जवळपास ३३४ मतदारांना भाजपसोबत होते. दुसरीकडे रवींद्र भोयर कोणालाच भेटत नाही, प्रचार करीत नसल्याच्या तक्रारी काँग्रेसकडे येऊ लागल्या. महाविकास आघाडीतील घटक शिवसेना आणि राष्ट्रवादीने उघडपणे यावर नाराजी दर्शवली होती.

त्यामुळे अखेरच्या टप्यात पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी निवडणुकीची सूत्रे आपल्या हातात घेतली. भोयर यांच्या प्रचाराऐवजी त्यांनी थेट उमेदवारच बदलला. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या स्वाक्षरीचे पत्र प्राप्त होताच काँग्रेसने अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला. याचा फायदा काँग्रेसला कितपत होतो हे उद्याच्या निकालातूनच स्पष्ट होणार आहे.

काँग्रेसला मतविभाजनाचा धोका

एक अधिकृत दुसरा समर्थीत असे दोन उमेदवार काँग्रेसचे रिंगणात होते. मतदानाच्या आदल्या दिवशी उमेदवार बदलण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला. त्यामुळे काँग्रेसला मतविभाजनाचा धोका संभवतो. तशी भीती अनेक नेते वर्तवीत आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा उमेदवार दोन मंत्र्यांनी बदलल्याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT