lek ladki yojana first installment received from government Sakal
नागपूर

Lek ladki yojana : ‘लेक लाडकी’चे ४५ लाख जमा; पहिला हप्ता वितरित

सकाळ वृत्तसेवा

Nagpur News : ‘बेटी पढाओ बेटी पढाओ’साठी मुलींचा जन्मदर वाढावा, मुलींच्या शिक्षणाला चालना मिळावी यासाठी राज्य शासनाकडून ‘लेक लाडकी’ ही योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मापासून तर ते १८ वर्षांची झाल्यानंतरपर्यंत एकूण १.०१ लाख रुपये मिळणार आहे.

या योजनेअंतर्गत जिल्ह्यात आजवर तीन हजारांहून अधिक पालकांनी महिला व बाल कल्याण विभागाकडे अर्ज सादर केले असून, पहिल्या हप्त्याची अर्थात पाच हजारांची रक्कमही ३१८ जणींच्या खात्यावर जमा झाली. तर ६०० ‘लेकी’च्या खात्यावर पहिला हप्ता जमा करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

राज्य शासनाकडून एक एप्रिलपासून ही योजना राज्यात कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेतील लाभाची रक्कम लाभार्थ्यांना ‘थेट लाभ हस्तांतरण’ (डीबीटी)द्वारे थेट बँक खात्यात देण्यात येत आहे. १ एप्रिल २०२३ नंतर एक मुलगी व मुलगा आहे.

त्यांना ही योजना लागू आहे. यासह ज्यांना एकच मुलगी आहे. दोन्ही मुली आहेत, असे कुटुंबीय या योजनेस पात्र ठरणार आहेत. या ‘लेक लाडकी’ योजनेची ग्रामीण भागात लाभार्थींची पात्रता पडताळणी करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका, संबंधित पर्यवेक्षिका,

नागरी भागात मुख्य सेविकांची आहे. योजनेतील लाभार्थ्यांना योजनेचा पहिला ५ हजारांचा हप्ता वितरित करण्यासाठी शासनाकडून जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण विभागाला ५० लाखांचे अनुदान प्राप्त झाले आहे. यातून सुमारे एक हजार पात्र लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याच्या वितरणाचे नियोजन विभागाचे आहे.

असा मिळतो लाभ

या योजनेंतर्गत पिवळ्या व केशरी रेशनधारकांना त्यांच्या कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर पाच हजार रुपये मिळतील. मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यावर सहा हजार, सहावीत गेल्यावर सात हजार रुपये, अकरावीत गेल्यावर आठ हजार रुपये मिळतील. १८ वर्षे पूर्ण झाल्यावर मुलीला ७५ हजार रुपये याप्रमाणे एकूण १ लाख १ हजार रुपये मिळतील.

‘लेक लाडकी’ योजनेच्या पहिल्या हप्त्यापोटी प्रती लाभार्थी ५ हजाराप्रमाणे ३१८ मुलींच्या संयुक्त बँक खात्यात वळते करण्यात आले आहे. लवकरच ६०० मुलींनाही योजनेतील पहिल्या हप्त्याची रक्कम मिळणार आहे.

-भागवत तांबे, महिला व बाल विकास अधिकारी, जि.प.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT