Liquor smugglers arrested in Nagpur 
नागपूर

ते तिघे बिनधास्त निघाले; पोलिसांनी कार थांबवली असता पुढे आला हा प्रकार...

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : लॉकडाउन 3.0 सतरा मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. लॉकडाउन वाढला असला तरी काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. यात दारूविक्रीलाही परवानगी दिली आहे. मात्र, मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी रेड झोनचे कारण पुढे करीत नागपुरात दारूविक्रीला बंदी घातली आहे. तसेच अगोदरसारखेच लॉकडाउन पाळण्याचे आवाहन केले आहे. यामुळे दारुड्यांची पार निराशा झाली आहे. यामुळे दारूची तस्करी वाढली आहे. असाच एक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे... 

तीन मेनंतर आपल्याला दारू मिळणार अशी आशा तळीरामांना होती. यामुळे त्यांनी दुकानांसमारे लाईन लावायला सुरुवात केली. मात्र, दारूची दुकाने उघडलीच नाहीत. यामुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडले. दारूची तहान भागविण्यासाठी तळीरामांनी आपला मोर्चा मोहफुलाच्या दारूकडे वळवला होता. आता आपल्याला देशी-विदेशी दारू प्यायला मिळेल अशी आशा त्यांनी होती. मात्र, तसे झाले नाही.

नागपूर शहरातील वाढती रुग्ण संख्या पाहून लॉकडाउन उठेल असे वाटत नाही. त्यामुळे दारुड्यांना इतक्‍या लवकर आपल्याला दारू प्यायला मिळेल अशी आशा आता राहिलेली नाही. त्यामुळे पुन्हा मोहफुलाच्या दारूकडे त्यांनी आपला मोर्चा वळवला आहे. आलीशान कारमध्ये मोहफुलाची गावठी दारू तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना यशोधरानगर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. आरोपींच्या ताब्यातून दारूसह साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई डीसीपी निलोतल यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार दीपक साखरे, पीएसआय श्रीनिवास दराडे, एएसआय विनोद सोलव, हवालदार मनीष भोसले, शोएब शेख, नरेश मोडक, राजकुमार पाल, नितेश धाबर्डे आणि प्रसेनजित जांभूळकर यांनी केली. 

गुप्त माहितीच्या आधारे कारवाई

बिनाकी मंगळवारीतून एका महागड्या कारमधून दारूची तस्करी होत असल्याची माहिती ठाणेदार दीपक साखरे यांना मिळाली. त्यांनी लगेच पथकाला सांगून सापळा रचला. शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता फोर्ड कार संशयास्पद स्थितीत भरधाव जाताना पोलिसांना दिसली. पोलिसांनी लगेच पाठलाग करून कारला अडवले. कारची झडती घेतली असता दोनशे लिटर मोहफुलाची दारू कारमधे आढळून आली.

साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांना कारमध्ये दारू आढळताच विनीत विजय सोमकुवर (वय 27, रा. बिनाकी मंगळवारी), महेश ऊर्फ लव दिलीप कांबळे (वय 25, रा. बिनाकी) आणि अस्मित पटेल (रा. पिवळी नदी) यांना ताब्यात घेतले. त्यांचा दुचाकीवरील युवक साथीदार चेतन भैसारे (रा. इंदोरा झोपडपट्टी-जरीपटका) हा पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी कार, दुचाकी, आणि दारूसह साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवार यांची पुन्हा भर पावसात सभा, म्हणाले- अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते अन्....

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

...तर त्यांना शिवतीर्थ कसा आशीर्वाद देणार? शिवाजी पार्कवरील मोदींच्या सभेवरून आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र

Malegaon Crime : पोलिसांनी पकडला प्रतिबंधित गुटखा, ११ लाख ३९ हजार ५६० रुपयांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT