lok sabha election ministry of information spread wrong details Sakal
नागपूर

Nagpur : माहिती विभागाकडून चुकीच्या माहितीचा प्रसार; पूर्वपीठिकेतील आकडे व निवडणूक विभागाच्या आकड्यात तफावत

सामान्य नागरिकांना खरी आणि वस्तुनिष्ठ माहिती देणे हे शासनाच्या माहिती विभागाचे काम आहे. परंतु या विभागाकडून चुकीची माहिती देण्यात येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सामान्य नागरिकांना खरी आणि वस्तुनिष्ठ माहिती देणे हे शासनाच्या माहिती विभागाचे काम आहे. परंतु या विभागाकडून चुकीची माहिती देण्यात येत आहे. लाखो रुपये खर्च करून चुकीची माहिती देणाऱ्यांवर काय कारवाई होणार, याकडेच सर्वांच लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे निवडणूक काळात चुकीची माहिती देणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४च्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने विदर्भातील सर्व लोकसभा मतदारसंघांच्या माहितीवर आधारित पूर्वपीठिका पुस्तिका तयार केली आहे.

आचारसंहितेच्या काळात विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. २००४ ते २०१९ या चार लोकसभा निवडणुकीचे निकाल, मतदार आणि मतदानाबाबतची माहिती यात आहे.

या पुस्तिकेवर लाखो रुपये खर्च करण्यात आल्याचे समजते. परंतु यात देण्यात आलेली माहिती (आकडे) चुकीचे आहेत. त्यामुळे या पूर्वपीठिकेच्या माध्यमातून लोकांना चुकीची व दिशाभूल करणारी माहिती मिळत आहे.

एक प्रकारे नागरिकांना खऱ्या माहितीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका होत आहे. निवडणुकीच्या काळात चुकीची माहिती पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा शासकीय यंत्रणांकडून देण्यात आला आहे.

परंतु शासनाच्या विभागाकडूनच चुकीची माहिती देण्यात येत असेल तर काय कारवाई होईल, असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. चुकीच्या माहितीवर करण्यात आलेल्या खर्चासाठी जबाबदार कोण, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे.

अवैध मते शून्य तरी मतदानापेक्षा वैध मते कमी

पूर्वपीठिकेतील आकड्यानुसार रामटेक लोकसभा मतदारसंघात ११,९६,७४४ एवढे मतदान झाले. यात वैध मते ११,८४,८२४ आहेत. तर अवैध मते शून्य आहेत. नागपूर लोकसभेत ११,८६,०५१ मतदान झाले असून ११,८१४७३ वैध मते असून अवैध मते शून्य आहे. आकड्यांची अशीच तफावत २०१४ च्या निकालात सुद्धा दाखवण्यात आली आहे.

चुकीचे आकडे

निवडणूक विभागाच्या मते २०१९ मध्ये नागपूर लोकसभा मतदार संघात २१,६०,२१७ मतदार होते. ११, ८२, ५०७ मतदान केले. तर रामटेकमध्ये १९,२१,०७४ मतदार होते व ११,९३,३०७ मतदारांनी मतदान केले.

परंतु पूर्वपीठिकेनुसार नागपूरमध्ये २०,६०,०४७ मतदार होते. व ११,८६,०५१ मतदारांनी मतदान केले. तर रामटेकमध्ये १८,१,९१२ मतदार होते व ११,९६,७४४ मतदारांनी मतदान केले.

आयुक्तांकडून कौतुक

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पूर्वपीठिकेच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण संदर्भ उपलब्ध झाले आहेत. ही संदर्भ पुस्तिका सर्वांसाठीच उपयुक्त ठरणारी आहे. माध्यम प्रतिनिधी तसेच निवडणुकीशी संबंधित असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना ही पुस्तिका तत्काळ संदर्भासाठी उपयुक्त ठरणार आहे. ही संदर्भ पुस्तिका अल्पावधीत व परिपूर्ण माहितीसह सुबक पद्धतीने तयार केल्याबद्दल विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी माहिती विभागाचे कौतुक केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल; शिवसेनेच्या (UBT) नेत्याचा दावा

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शायना एन सी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT