mahavikas agahdi and mahayuti sakal
नागपूर

Loksabha Election : युती-आघाडीचा उमेदवारांना फायदा नाहीच? नागपूरमध्ये आकडेवारी गोळा करण्याचे काम सुरू

लोकसभेच्या निवडणुकीत नागपूरमध्ये भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांना महायुती आणि महाविकास आघाडीचा फायदा किती झाला याची आकडेवारी सध्या गोळा केली जात आहे.

राजेश चरपे

नागपूर - लोकसभेच्या निवडणुकीत नागपूरमध्ये भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांना महायुती आणि महाविकास आघाडीचा फायदा किती झाला याची आकडेवारी सध्या गोळा केली जात आहे. प्रत्यक्षात एक टक्क्यावर कोणालाही फायदा झाला नसल्याचा प्रारंभिक निष्कर्ष काढण्यात आला असल्याचे समजते. त्यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीत युती, आघाडीचे काही खरे नसल्याचे बोलले जात आहे.

नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस याच दोन पक्षांत सातत्याने लढत आहे. महापालिकेच्या निवडणुकीचा अपवाद वगळता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला येथे फारसे स्थान नाही. आता तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे दोन तुकडे झाले आहेत. त्यामुळे जी काही ताकद होती तीसुद्धा विभागली गेली आहे. शिवसेना-भाजप युती असताना सेनेला जिल्ह्यात विधानसभेत स्थान दिले जात होते. रामटेकचा अपवाद वगळता शिवसेनेचा आमदार इतर मतदारसंघातून जिंकून आला नाही. त्यामुळे एक-एक जागा त्यांच्याकडून घेणे भाजपने सुरू केले.

नागपूर शहरात पूर्व नागपूर, मध्य नागपूर सुरुवातीला शिवसेनेकडे होते. युतीमार्फत शिवसेनेच्या उमेदवारांनी विधानसभेची निवडणूकसुद्धा लढवली. पूर्व नागपूरमध्ये शिवसेनेचे प्रवीण बरडे आणि शेखर सावरबांधे यांचा विजय थोडक्यात हुकला होता. त्यानंतर भाजपने पूर्व आपल्याकडे घेऊन दक्षिण सेनेला सोडले. युती तुटल्यानंतर शिवसेना आणखीच कमजोर झाली.

सध्या नागपूर शहरातील भाजप आणि काँग्रेसची राजकीय परिस्थिती बघता आगामी विधानसभेत शिवसेना व राष्ट्रवादीला मतदारसंघ सोडण्याची सूतराम शक्यता नाही. लोकसभेच्या निकालानंतर हे अधिकच स्पष्ट होणार आहे.

कोण कोण फिरले?

भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांच्यासोबत अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत पवार, शिंदे सनेचे शहर प्रमुख सूरज गोजे प्रामुख्याने प्रचारात सहभागी झाले होते. दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांच्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख किशोर कुमेरिया, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी प्रचार केला. सोबतच इतराही छोटेमोठे पक्ष युती व आघाडीसोबत होते.

आघाडी आणि युतीच्या उमेदवारांना याचा कितपत फायदा झाला हे निकालानंतरच प्रत्यक्ष समोर येणार आहे. त्याकरिता बुथनिहाय मतदानाची आकडेवारी सर्वच पक्षाकडे उपलब्ध आहे. त्याचा आधार घेऊन आकडेमोड केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT