lord ram Idol brotherhood should be accepted by everyone culture india significance Sakal
नागपूर

Ayodhya Ram Mandir : मन राम रंगी रंगले : प्रभू रामचंद्रांचे आदर्श बंधुत्व प्रत्येकाने स्वीकारावे

अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या मंदिराची निर्मिती होऊन, सोमवारी रामलल्ला मंदिरात विराजमान होणार आहेत, ही भारत देशासाठी मोठ्या गौरवाची गोष्ट आहे. आपल्या देशातील ही ऐतिहासिक घटना असून, हा भारताचा नवोदय आहे.

सकाळ वृत्तसेवा

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या मंदिराची निर्मिती होऊन, सोमवारी रामलल्ला मंदिरात विराजमान होणार आहेत, ही भारत देशासाठी मोठ्या गौरवाची गोष्ट आहे. आपल्या देशातील ही ऐतिहासिक घटना असून, हा भारताचा नवोदय आहे.

ज्याप्रमाणे उगवत्या सूर्याला पाहून आपल्याला आनंद होतो तोच आनंद प्रभू श्रीरामाची बालमूर्ती पाहून प्रत्येक भारतीयाला होतोय. आदर्श भावाचे गुण प्रभू रामात आहेत. आपण आपल्या बंधूंवर प्रेम करतो; परंतु भावासाठी त्याग करण्याची प्रेरणा आपल्याला प्रभू रामापासून मिळते. रामाने आदर्श भावाचे उदाहरण दिले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून इतरही भावंडांनी कृती केली. त्यामुळे रामाचे घडणे महत्त्वाचे आहे. राम घडले नसते तर लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न घडणे अशक्यच होते.

  • आदर्श भावाचे उदाहरण म्हणजे प्रभू रामचंद्र आहेत. रामाला वनवासात पाठवण्यावरून भरत आईवर रागावतो तेव्हा त्याला पुत्रधर्माचे पालन करण्याचा मंत्र प्रभू राम देतात. त्यावेळी ते मोठ्या त्यागमय भावाची भूमिका पार पाडतात.

  • राममंदिराच्या निर्मितीनंतर तरी नागरिकांनी किमान आपसातील वैरभाव सोडला पाहिजे. संपत्तीवरून होणारे कलह टाळले पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने राम अंतकरणात उतरविल्याचे समाधान मिळेल.

  • तापट स्वभावाच्या भाऊ लक्ष्मणाला वेळोवेळी न्याय आणि सत्येचा मार्ग दाखविण्याचे कार्य प्रभू रामचंद्र करतात. यातून आदर्श भावाचा वस्तुपाठच ते घालून देतात. मंथरेमुळे कुटुंबात कलह निर्माण होतो. परंतु त्याच मंथरेसोबत संयमाने वागून प्रभू रामचंद्र भावांपुढे आदर्श वस्तुपाठच ठेवतात.

सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी एका प्रकरणात खुलासा करताना ज्या देशाला राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांच्यासारख्या भावांची पार्श्वभूमी लाभली आहे त्या देशात भावा-भावांमध्ये कलह, वाद अपेक्षित नाही, असे म्हटले होते.

आता अयोध्येतील राममंदिराच्या निर्मितीनंतर भारतात असे वाद अपेक्षित नाही, असे मला वाटते. ज्यांनी आपल्याला मर्यादा शिकवली त्या प्रभू श्रीरामाच्या मंदिरात रामलल्ला विराजमान होत आहे, याचा खूप आनंद आहे.

- श्रीनिवास वरखेडी, कुलपती केंद्रीय संस्कृत विद्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT