नागपूर : ‘मैं फांसी लगाने जा रहा हू’, असं मित्राला सांगून इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना खळबळजनक घटना कळमन्यातील धरमनगर येथे रविवारी दुपारी घडली. शिवा चैनसिंग सलामे (वय ४०) असे मृताचे नाव आहे. तो कळमना बाजारात काम करायचा.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवा काही वर्षांपासून महिलेसोबत राहायचा. काही दिवसांपूर्वी महिला त्याला सोडून अन्यत्र राहायला गेली. यामुळे तो तणावात राहायला लागला. रविवारी दुपारी त्याने मित्राच्या मोबाइलवर संपर्क साधला. ‘मैं फांसी लगाने जा रहा हूं’ असे त्याला सांगून मोबाइल बंद केला. त्यानंतर त्याने कापड्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा मित्र घरी आला. त्याला शिवा हा गळफास लावलेला दिसला. त्याने कळमना पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस तेथे पोहोचले. पंचनामा करून पोलिसांनी शिवाचा मृतदेह मेयो हॉस्पिटलकडे रवाना केला. याप्रकरणी कळमना पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
आईला भेटायला आलेल्या भावाला मारहाण
आईला भेटायला आल्याने लहान भावाने मोठ्या भावाला काठीने मारहाण केली. कळमन्यातील न्यू ओम साईनगर येथे ही घटना घडली. रमेश ईश्वरसिंग कछवा (वय ४६) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी कळमना पोलिसांनी रमेश यांचा लहान भाऊ सुजित ईश्वरसिंग कछवा (वय ४०) याच्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला. कौटुंबिक कलहामुळे रमेश व सुजीत वेगळे राहतात. त्यांची आई सुजितकडे राहते. रविवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास रमेश हे आईला भेटायला सुजितकडे आले. ‘माझ्या घरी कशासाठी आला’, अशी विचारणा करीत सुजितने रमेश यांच्यासोबत वाद घातला. सुजितने रमेश यांच्यावर काठीने हल्ला केला. शेजारी राहणारे रमेश सलामे हे वाद सोडविण्यासाठी आले असता सुजितने त्यांनाही मारहाण केली.
बेकरी मालकाचा नोकरावर हल्ला
क्षुल्लक कारणावरून मालकाने फावड्याने नोकरावर हल्ला केला. ही घटना रामदासपेठेतील केक ॲंण्ड कुकीज बेकरी येथे रविवारी दुपारी घडली. कमलेश यादवराव गभने (वय २६ रा. अजयनगर, टेकडी) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी सिराज मिराज अहमद (वय ५५, रा. दौलतनगर, मानेवाडा) यांच्याविरुद्ध दुखापतीचा गुन्हा दाखल केला आहे. रविवारी दुपारी कमलेशने केक तयार करणाऱ्या खोलीचा दरवाजा बंद केला नाही. त्यामुळे सिराज यांनी त्याच्यासोबत वाद घातला. वाद विकोपाला गेला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.