नागपूर : देशातील हवामान विभागाने यंदा सरासरी इतका किंवा त्यापेक्षा अधिक पावसाचा अंदाज व्यक्त करून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या होत्या. मात्र वरुणराजाने निराशा केल्याने त्यांच्या आशा फोल ठरल्या आहेत. दहा वर्षांत जूनमध्ये दुसऱ्यांदा जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे उरलेल्या तीन महिन्यांकडे लक्ष लागले आहे.
चंद्रपूरचे हवामानतज्ज्ञ प्रा. सुरेश चोपणे यांनी उपलब्ध करून दिलेल्या आकडेवारीनुसार, जून महिन्यात नागपूर जिल्ह्यात सरासरी १९०.६ मिलिमीटर पाऊस पडतो. या महिन्यात सर्वाधिक ५००.६ मिलिमीटर पावसाचा विक्रम १८८१ मध्ये नोंदविण्यात आला, तर २४ तासांत सर्वाधिक ३१५ मिलिमीटर पावसाची नोंद १२ जून १९११ रोजी करण्यात आली होती.
मात्र यावेळी संपूर्ण जूनमध्ये आतापर्यंत केवळ १२६.९ मिलिमीटर पावसाचीच नोंद झाली आहे. गेल्या दशकातील जूनच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, जिल्ह्यात दुसऱ्यांदा इतका कमी पाऊस बरसला आहे.
यापूर्वी २०१९ मध्ये फक्त ७२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती. विविध हवामानतज्ज्ञ व संकेतस्थळांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुलैच्या पहिल्या पंधरवड्यातही कमी विदर्भात अतिशय कमी पाऊस राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर पिके वाचविण्याचे मोठे आव्हान राहणार आहे. सुदैवाने जुलैच्या उत्तरार्धात व त्यानंतर ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये दमदार पाऊस पडून बॅकलॉग भरून निघण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
वर्ष - एकूण पाऊस
२०१५ - १३५.७ मिमी
२०१६ - १७६.६ मिमी
२०१७ - २१६.४ मिमी
२०१८ - २९३.५ मिमी
२०१९ - ७२.६ मिमी
२०२० - २७७ मिमी
२०२१ - १९७.७ मिमी
२०२२ - १३५.७ मिमी
२०२३ - १५२.३ मिमी
२०२४ - १२६.९ मिमी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.