Lyrid  sakal
नागपूर

Lyrid : आज दिसणार लायरीड उल्कावर्षाव

खगोल प्रेमींसाठी एप्रिल महिना नाविण्यपूर्ण ठरत आहे

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : खगोल प्रेमींसाठी एप्रिल महिना नाविण्यपूर्ण ठरत आहे. नुकतेच २० तारखेला हायब्रीड सूर्यग्रहण अनेकांची बघितले. त्यातच आता २२ आणि २३ एप्रिलला लायरीड उल्कावर्षाव पाहण्याची संधी मिळणार आहे. उत्तर आणि पूर्व दिशेला सूर्य मावळल्यानंतर लायरा तारा समूहात वेगा ताऱ्याजवळ रात्री १०.३० पासून मध्यरात्रीपर्यंत हा उल्कावर्षाव पाहता येणार आहे. ताशी १५ ते २५ उल्का दिसू शकेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

हा उल्कावर्षाव थॅचर या धूमकेतूमुळे दिसतो. १८६१ मध्ये हा धूमकेतू पृथ्वीजवळून गेला होता. तेव्हापासून हा उल्कावर्षाव दिसत आहे. पुढे जेव्हा हा धूमकेतू पृथ्वीच्या भ्रमणमार्गाजवळून जाईल तेव्हा २० वर्षांनंतर २०४२ मध्ये मोठा उल्कावर्षाव दिसणार असे खगोल अभ्यासक सांगत आहेत. हा धूमकेतू पुन्हा २४५ वर्षांनी म्हणजे २२७८ मध्ये पृथ्वीजवळून जाणार आहे. तेव्हा उल्कांचा जणू पाऊस पडल्या सारखी स्थिती असेल.

या सी १८६१/जी१ धूमकेतूचा शोध अमेरिकेतील अल्फ्रेड थॅचर यांनी ५ एप्रिल १८६१ मध्ये लावला. पण गेल्या २५०० वर्षांपासून प्राचीन लोक हा उल्कावर्षाव बघत आहेत. चिनी लोकांनी इ. सन पूर्व ६८७ मध्ये हा उल्कावर्षाव पाहिल्याची नोंद असल्याचे स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.

असे करा निरीक्षण

उल्कावर्षाव दुर्बिणीतून दिसत नाही, लहान (१०-× ५०)आकाराच्या द्विनेत्रीने तो अधिक स्पष्टपणे बघता येतो. अंधाऱ्या रात्री जमिनीवर लेटून आकाशाकडे पाहिल्यास उत्तम पद्धतीने उल्कावर्षावाचे निरीक्षण करता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT