नागपूर

Maha Metro: मेट्रो अधिकाऱ्यांकडून रेल्वे मंत्रालयाची फसवणूक ! माहिती अधिकारातून धक्कादायक माहिती उघड, जाणून घ्या..

सकाळ डिजिटल टीम

Mahametro Fake RSDO Certificate:महामेट्रोने रिसर्च डिजाईन एन्ड स्टॅनडर्ड्स ऑर्गनाएझेशनचे (आरडीएसओ) बनावट पत्र तयार करून मेट्रोचे संचालन सुरू केल्याची धक्कादायक माहिती माहिती अधिकारात पुढे आली आहे. महामेट्रोतील या अनागोंदी कारभाराविरोधात तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दिक्षित यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी कॉंग्रेसने आज केली.

महामेट्रो प्रकल्पात ९०० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका कॅगच्या अहवालात ठेवण्यात आला. परंतु याविरोधात अद्याप कारवाई झाली नाही. महामेट्रोतील या अनियमिततेवर बोट ठेवत शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्त्वात आज आंदोलन करण्यात आले. यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले.

आतापर्यंत पहिल्या टप्प्याचेही काम पूर्ण झाले नाही. अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे प्रकल्पाचा खर्च ६०० कोटी रुपयांनी वाढला आहे. हा वाढीव खर्च अधिकाऱ्यांकडून वसूल करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. मेट्रोचे संचालन करण्यासाठी आवश्यक असलेल्या विद्युत वाहिनीच्या प्रमाणपत्रासंदर्भात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. चक्क केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाचीच फसवणूक मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी केल्याचे पुढे आले. मेट्रो रेल्वे नागरिकांसाठी सुरू करण्यापूर्वी आरडीएसओकडून मान्यता घेणे बंधनकारक असते.

या संस्थेची कुठलीही परवानगी न घेता २६ डिसेंबर २०१७ रोजीचे बनावट पत्र तयार करून मेट्रो रेल्वे सुरू करण्यात आल्याची माहिती माहिती अधिकारात आरडीएसओने दिली. या संदर्भात महामेट्रोचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित यांच्यासह दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवून तत्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. तसेच महामेट्रोमध्ये सेवेत नसताना मागिल सात महिन्यांपासून मुंबईतील मेट्रोच्या बंगल्यातून दीक्षित यांची हकालपट्टी करुन त्यांच्याकडून याचे खर्च वसूल करावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली.(Latest Marathi News )

घोटाळेच घोटाळे !
मागील वर्षी डिसेंबरमध्ये प्रकाशित झालेल्या कॅगच्या अहवालात महामेट्रोने ९०० कोटींचे भ्रष्टाचार केल्याचा ठपका लावण्यात आला. यासह वर्षभरात विविध १९ कामांत महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी खासगी कंपन्यांना कोट्यवधीचे लाभ मिळवून देण्यासाठी तब्बल ६०० कोटींचे घोटाळे केल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे.

या भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचे काम राज्य सरकारने केली. डॉ. दीक्षित यांची पदावरुन तत्काळ हकालपट्टी करुन त्यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांच्या मालमतेचीही चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. हिंगणा मार्गावरील कार डेपोमध्येही मुरूम घोटाळा करण्यात आला. चार वर्षात मेट्रो धावत असलेल्या वायडक्टला दोन ठिकाणी तडे गेले आहे. त्यामुळे किती निकृष्ट दर्जाचे कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही आमदार ठाकरे यांनी केला आहे. (Latest Marathi News )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Helicopter: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोडक्यात बचावले! हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग; काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Vidhansabha Election 2024 : महायुतीत ४५ जागांच्या वाटपावर खल; जागा सोडण्यावरून स्थानिक पदाधिकारी आक्रमक

Sports News on 18th October 2024: भारताचे कसोटी सामन्यात पुनरागमन ते पाकिस्तानचा इंग्लंडविरूद्ध दणदणीत विजय

रणबीर- आलियाच्या बांद्रामधील घराची पहिली झलक समोर; नेटकऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट, म्हणाले- हे काय बनवलंय भाऊ..

Diwali Recipe : दिवाळीत नुसता चिवडा बेचव लागतो, विकतची कशाला घरी अशी बनवा कुरकुरीत शेव

SCROLL FOR NEXT