नागपूर

महाराष्ट्र अँटीबायोटीक कंपनीचा तब्बल १०० कोटीचा निधी गहाळ; सहा वर्षानंतरही कंपनीला कुलूपच

सकाळ वृत्तसेवा

हिंगणा (जि. नागपूर) : केंद्र सरकारने (Government of India) मोठा गाजावाजा करून सहा वर्षांपूर्वी हिंगणा एमआयडीसीतील (Hingna MIDC) महाराष्ट्र अँटीबायोटीक (Maharashtra Antibiotics) कंपनीला पुनर्जिवित करण्यासाठी १०० कोटीचा निधी मंजूर केला. हा निधी केंद्र सरकारनेच गहाळ केला का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. ही कंपनी सुरू झाली असती तर कोरोनाच्या (Coronavirus) काळात आधारवड ठरली असती. (Maharashtra Antibiotics do not get 100 crore fund from central government even after 6 years)

हिंगणा एमआयडीसीत राज्य सरकारची महाराष्ट्र अॅंटोबायटीक कंपनी कार्यरत होती. ही कंपनी काही वर्षांपूर्वी शासनाने बंद केली. केंद्रात मोदी सरकार सत्तेत येताच पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या पहिल्या वर्षीच्या टप्प्यात शंभर कोटी रुपयांचा निधी या कंपनीला पुनर्जिवित करण्यासाठी केंद्र सरकारने मंजूर केला. कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितिन गडकरी व केंद्रीय रसायन,खते व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत भव्य असा कार्यक्रम पार पडला. यामुळे बंद पडलेली कंपनी पुन्हा सुरू होईल अशी आशा निर्माण झाली होती.

कार्यक्रमानंतर महाराष्ट्र अँटिबायोटिक कंपनीला मंजूर केलेला १०० कोटीचा निधी केंद्र सरकारने कुठे वळता केला, हे कळले सुद्धा नाही. राज्य शासनाचे महाराष्ट्र अँटिबायोटिक कंपनी येथे इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे. यामुळे १०० कोटीच्या निधीतून कंपनीमधून औषधीचे उत्पादन करणे शक्‍य झाले असते. मात्र केंद्र सरकारने या कंपनीचा निधी परस्पर गहाळ करून हिंगणा एमआयडीसी परिसरातील जनतेच्या तोंडाला पाने पुसली.

कोरोना संक्रमणाच्या काळात या कंपनीत कोरोनासाठी लागणारी औषधी तयार करता आली असती. यामुळे हजारो करून रुग्णांचे जीव वाचवता येणे शक्य होते. मात्र मंजूर झालेला निधी इतरत्र वळवून ग्रामीण भागातील जनतेची थट्टा केंद्र सरकारने केली असल्याची चर्चा जनतेमध्ये सुरू आहे. कंपनी सुरू झाली असती तर शेकडो तरुणांना रोजगारही उपलब्ध झाला असता, कोरोना महामारीच्या काळात ही कंपनी आधारवड ठरली असती.

हिंगणा एमआयडीसीतील अनेक उद्योग बंद झाले आहेत. कोरोना महामारीच्या काळात पुन्हा लहान उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहेत. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने मंजूर केलेला १०० कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आता हिंगणा परिसरातील जनतेमध्ये केली जात आहे. केंद्र सरकारमध्ये हेवीवेट मंत्री ओळखले जाणारे केंद्रीय भृपुष्ठ वाहतुक मंत्री नितीन गडकरी यासाठी पुढाकार घेणार का, असा प्रश्न जनतेत विचारला जात आहे.

हिंगणा एमआयडीसीतील महाराष्ट्र अँटिबायोटिक कंपनीला केंद्र सरकारने १०० कोटीचा निधी मंजूर केला होता. त्यावेळी केंद्रीय रासायनिक खते व उर्वरक राज्यमंत्री होतो. मधल्या काळात हा निधी एचसीएल कंपनीकडे वळता करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. राज्य सरकारनेही याचा पाठपुरावा केला नाही. राज्य सरकारही यात अपयशी ठरले आहे. सध्या मी केंद्रात सहभागी नसल्याने याची नेमकी वस्तुस्थिती काय, आहे याची माहिती स्पष्टपणे सांगू शकत नाही. कंपनीची जागा व इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे.यामुळे ही कंपनी कोरोनाच्या काळात सुरू होणे अपेक्षित आहे. यासाठी राज्य शासनाने पाठपुरावा करावा.
हंसराज अहीर, माजी केंद्रीय रसायन, खते व उर्वरक, राज्यमंत्री

संपादन - अथर्व महांकाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT