नागपूर

Winter Session Nagpur: विधानभवनावर मोर्चांचा झंझावात काँग्रेसच्या विराट मोर्चासह १४ संघटनांचा हल्लाबोल, परिसर दणाणला

विधिमंडळावर काँग्रेसच्या विराट मोर्चासह एकूण १४ मोर्चे धडकल्याने विधानभवनावर मोर्चांचा झंझावात बघायला मिळाला.

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra Assembly Winter Session: आज विधिमंडळावर काँग्रेसच्या विराट मोर्चासह एकूण १४ मोर्चे धडकल्याने विधानभवनावर मोर्चांचा झंझावात बघायला मिळाला. त्यामुळे सीताबर्डी, वर्धा मार्ग, यशवंत स्टेडियम, गणेश टेकडी परिसरात आंदोलकांची मोठी गर्दी बघायला मिळाली. शेतकऱ्यांच्या प्रश्नाला आंदोलनाचा मुख्य मुद्दा बनवित काँग्रेस पक्षाने सरकारवर हल्लाबोल केला.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. यावेळी ते म्हणाले, राज्यात शेतकरी, शेतमजूर, कामगार, बेरोजगारांचे प्रश्न मोठे आहेत. शेतकऱ्यांना भरपूर मदत दिली असे सुपर मुख्यमंत्री म्हणतात. मग ती गेली कुठे, असा सवाल उपस्थित करून या सरकारला पराभूत केल्याशिवाय शेतकरी सुखी आणि समाधानी होणार नाहीत असे सांगून त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

यासह धनगर समाज, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर्स फेडरेशन, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार, समग्र शिक्षा करार कर्मचारी श्रमिक संघ, विदर्भ जॉइंट अ‍ॅक्शन कमिटी, राज्यस्तरीय कर्णबधिर असोसिएशन, जनसेवा गोंडवाना पार्टी, आदिवासी विकास परिषद, स्वतंत्र अंगणवाडी कर्मचारी संघटनेसह इतरही संघटनांच्या मोर्चारूपी आंदोनलाने सिव्हिल लाइन्स परिसह दणाणून गेला.

विधानसभेतही अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीच्या मुद्द्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. महाराष्ट्र आज गुन्हेगारी, भ्रष्टाचार, दंगलीत देशात एक नंबरवर आहे. या सरकारला शेतकऱ्यांचे देणेघेणे नाही, बेरोजगारांची थट्टा चालवली असल्याचा आरोप यावेळी पटोले यांनी केला. विजय वडेट्टीवारांनी आता शेतकरीच सरकारला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही असे ठणकावून सांगितले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad Election: पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील पराभूत कसे पराभूत झाले ? आघाडीत बिघाडीचा दोघांनाही बसला फटका

Viral Video : नवरा बनला सुपरमॅन; चोराला पकडण्यासाठी फिल्मी स्टाईलने टॅम्पोला लटकला!

Latest Marathi News Updates : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या रणनीतीसाठी काँग्रेसची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक

Krishna Khopde : पूर्व नागपुरात ‘कृष्ण कमळ’ ला तोड सापडेना, सलग चौथ्यांदा विजय : कॉंग्रेसनंतर राष्ट्रवादीही हतबल

Rahul Kul: आमदार राहुल कुल यांची अनोखी हॅटट्रीक; मंत्रीपदाचा वनवास कधी संपणार?

SCROLL FOR NEXT