नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दोन आठवड्यांत विरोधकांपेक्षा सत्ताधारी पक्ष आक्रमक आणि वरचढ दिसून आले. सत्ताधारी आमदारांनीच मुद्दे काढत विरोधी पक्षाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी मंत्र्यांची विविध प्रकरणे काढण्याचा इशारा अधिवेशनापूर्वी दिला होता. मात्र, सुरुवातीच्या दोन आठवड्यांत एकही प्रकरण बाहेर आले नाही. त्यामुळे तिसऱ्या व शेवटच्या आठवड्यात विरोधक कोणत्या मंत्र्यांची कोणती प्रकरणे बाहेर काढतात, हेच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Latest Marathi News)
सत्ताधारी तीन पक्षांत अनेक मुद्द्यांवर मतभेद असले तरी त्याचा फायदा अद्याप तरी विरोधकांना घेता आल्याचे दिसून आले नाही. उलट पुरवणी मागण्यातील निधी वाटपावरून विरोधकांमधीलच मतभेद दिसून आले. माजी मंत्री नवाब मलिकांच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याची प्रयत्न विरोधकांनी केला. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्र लिहिले. त्यामुळे अजित पवार गट अडचणीत आला. (Marathi Tajya Batmya)
दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी दिशा सॅलियनचा मुद्दा वर काढत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. त्यानंतर सलीम कुत्ताच्या प्रकरणावरून पुन्हा ठाकरे गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विरोधकांनी सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांची प्रकरणे काढण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून विरोधक आक्रमक पवित्रा घेतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. परंतु पहिल्या दोन्ही आठवड्यांत तसे दिसून आले नाही. सोमवारपासून तिसऱ्या आठवड्याचे कामकाज सुरू होणार असून ते तीनच दिवस चालणार आहे.(Latest Marathi News)
विरोधकांचे शस्त्र बोथट करण्यात यश
शेतकऱ्यांचा मुद्दाच विरोधकांनी जोरकसपणे लावून धरला. त्यांनी धारावीच्या मुद्दाही उपस्थित केला. शेतकऱ्यांना भरीव मदत जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगत सत्ताधाऱ्यांना विरोधकांचे शस्त्र बोथट करण्यात यश आले. (Marathi Tajya Batmya)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.