काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघाला अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईपासून वगळण्यात आल्याने आमदार तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. हरकरिताचा मुद्धा उपस्थित करून त्यांनी विधानसभेत याकडे सरकारचे लक्ष वेधले.
अवकाळी पावसामुळे कापूस, तूर व संत्रा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जेव्हा पंचनामे झाले तेव्हा काटोल व नरखेड तालुक्याचा अहवालात शासनाकडून निरंक दाखवण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन देखील जर सरकार असे करत असेल तर हा शेतकऱ्यांवर हा अन्याय आहे. नागपूर जिल्ह्यात कोंढाळी ग्रामीण रुग्णालय आहे. त्याचे अर्धवट काम झाले असून ते पूर्ण करण्यासाठी सात ते आठ कोटींची आवश्यकता आहे.
मागच्या दोन अधिवेशनात मंत्र्यांनी सांगितले होते की, आठ दिवसात पैसे उपलब्ध करून देऊ. पण अद्यापपर्यंत त्यांचे आठ दिवस पूर्ण झालेले नाहीत. हा निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावे अशी विनंती अनिल देशमुख यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना केली. अनेक जिल्ह्यांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती तयार आहेत.
पद निर्मिती न झाल्यामुळे तेथे आरोग्य कर्मचारी उपलब्ध नाहीत. याठिकाणी पदनिर्मिती करून लवकरात लवकर या इमारती सुरू करण्यात यावेत, अशी मागणी माजी गृह मंत्री आमदार अनिल देशमुख यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विधानसभेत केली. (Latest Marathi News)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.