CM Eknath Shinde sakal
नागपूर

CM Eknath Shinde : महाराष्ट्राचा विकास हाच युतीचा धर्म : शिंदे,पारशिवनीत दोन हजार कोटींच्या कामाचे उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा

पारशिवनी : ग्रामीण भागात सिमेंट रस्त्यांचे जाळे, पूल, ६०० कोटींचे डांबरी रस्ते, पांदण रस्ते व अनेक योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्याचे काम शिंदे सरकारने केले. महाराष्ट्राचा विकास हाच युतीचा धर्म आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

रामटेक विधानसभा क्षेत्रात महाराष्ट्र सरकारच्या पुढाकाराने दोन हजार कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी (ता.१३)कुवारा भिवसन मंदिराच्या पटांगणात केला. यावेळी आमदार कृपाल तुमाने, माजी आमदार राजू पारवे, आमदार आशीष जैस्वाल यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

आज महाराष्ट्रात अनेक योजनांच्या माध्यमातून गोरगरिबांना सुविधा देत असून लाडक्या बहिणींसाठीची योजना कार्यान्वित केली. या योजना पुढेही सुरु राहतील. असेही शिंदे म्हणाले.दहा वर्षांत ठाकरे उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचा विकास करता आला नाही. युती सरकारने तो अडीच वर्षांत केला. हे सरकार घेणारे नसून देणारे असल्याचे ते म्हणाले.

आमदार आशीष जयस्वाल यांना ‘कार्यसम्राट’ ही पदवी बहाल करीत कार्यकुशल आमदार या भागाला लाभला असून पुढील निवडणुकीत जयस्वाल यांना पुन्हा आमदार केल्यास या भागाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल, अशी मुख्यमंत्र्यांनी जयस्वालांची स्तुती केली. यावेळी सर्व शासकीय विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, पोलिस विभागातील अधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. पारशिवनी पोलिसांनी शहरात तगडा पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

आमदार जयस्वाल यांचा शिवसेनेते (शिंदे) अधिकृत प्रवेश

अपक्ष आमदार आशीष जयस्वाल यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे)पक्षात प्रवेश केला. रामटेक मतदारसंघात निवडणूक लढण्यास मुख्यमंत्र्यांचे आशीर्वाद मिळाल्यास निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून युतीचा उमेदवार राहणार असल्याचे यावेळी जयस्वाल यांनी जाहीर केले. युती धर्म पाळायचा असल्याने अधिकृत घोषणा करण्यात मुख्यमंत्र्यांनी चतुराई दाखवित शिवसेनेचा अप्रत्यक्ष उमेदवार घोषित केल्याचे दिसून आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Meeting: हरियानातील पराभवाचा नेत्यांना धसका! काँग्रेसच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; मराठा-ओबीसींबाबत घेतला मोठा निर्णय

Supreme Court : कोरोना लसीच्या साईड इफेक्ट्ससंबंधी याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले खडे बोल

Latest Maharashtra News Live Updates: ओव्हरटेक करण्यावरून झालेल्या भांडणातून व्यक्तीला बेदम मारहाण

Ranji Trophy 2024: ऋतुराजच्या महाराष्ट्राला जम्मू-काश्मीर ठरले वरचढ, पहिलाच सामना ड्रॉ

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 600 अंकांनी वधारला, विप्रो, टेक महिंद्रामध्ये जोरदार खरेदी

SCROLL FOR NEXT