nagpur municipal corporation sakal
नागपूर

Nagpur : महानगरपालिकेत १३ नगरसेवकांची पडणार भर

सदस्य संख्या होणार १६४; अध्यादेश जारी

- राजेश प्रायकर, नीलेश डोये -सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महानगरपालिकेतील नगरसेवकांची संख्या वाढण्याबाबत शासनाने अध्यादेश जारी केला. त्यानुसार नागपूर महानगरपालिकेत साधारणतः १३ नगरसेवकांची भर पडणार आहे. परिणामी नगरसेवकांची एकूण संख्या १६४ च्या घरात जाईल. यामुळे वार्ड व प्रभागाची लोकसंख्या काहीशी कमी होणार असल्याने इच्छुकांनाही काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

दर वहा वर्षांनी जनगणना होते. परंतु कोरोनामुळे यंदा ही झाली नाही. लोकसंख्येत वाढ होत आहे. पुरसे प्रतिनिधित्व मिळण्यासाठी शासनाने लोकसंख्येच्या आधारे नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील महानगर पालिकांच्या वर्ग व प्रस्तावित लोकसंख्येच्या आधारे सदस्यसंख्या निश्चित करण्यासाठी काही निकष दिलेत. २४ लाखांपेक्षा अधिक व ३० लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या महानगर पालिकेची सदस्य संख्या १५६ निश्चित करण्यात आली. त्याच प्रमाणे २४ लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात ५० हजार इतक्या लोकसंख्येसाठी १ अतिरिक्त सदस्य राहणार आहे.

२०११ नुसार शहराची लोकसंख्या २४ लाख दहा हजार होती. २०२१ मध्ये जनगणना झाली नाही. त्यामुळे दररोज मृत्यू व जन्म या आधारावर गेल्या दहा वर्षातील काढण्यात आलेल्या सरासरीनुसार शहराची सध्याची लोकसंख्या २८ लाख असल्याचे मनपातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने नमुद केले. अर्थात २४ लाख लोकसंख्येत ४ लाखांची भर पडणार आहे. २४ लाख लोकसंख्या असलेल्या शहरात प्रत्येक ५० हजार लोकसंख्येसाठी १ सदस्य वाढणार आहे. त्यामुळे चार लाख लोकसंख्येसाठी आठ सदस्य वाढणार आहेत. अध्यादेशानुसार २४ लाख लोकसंख्येच्या शहरात निश्चित केलेल्या सदस्यांची संख्या १५६ आहे. त्यात आठ सदस्यांची भर पडणार असल्याने अध्यादेशानुसार ही संख्या १६४ पर्यंत जाण्याची शक्यता सूत्राने व्यक्त केली. आता सध्या महापालिकेत १५१ सदस्य असून त्यात एकूण १३ सदस्यांची भर पडणार आहे. यापूर्वीच्या निवडणुकीच्या वेळी ही संख्या सहाने वाढविण्यात आली होती. त्यापूर्वी महानगर पालिकेची सदस्य संख्या १४५ होती.

असे आहेत अध्यादेशातील निकष

  • १) तीन लाखांपेक्षा अधिक व ६ लाखापर्यंत लोकसंख्येच्या मनपासाठी सदस्य संख्या किमान ७६ इतकी असून ३ लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक १५ हजार लोकसंख्येमागे १ अतिरिक्त सदस्याची तरतूद असेल.ही तरतूद ९६ पेक्षा अधिक नसेल

  • २) ६ लाखांपेक्षा अधिक १२ लाखांपर्यंतच्या महानगर पालिकांची सदस्य संख्या किमान ९६ इतकी असून ६ लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक २० हजार लोकसंख्येसाठी १ अतिरिक्त सदस्याची तरतूद करण्यात आली. ही सदस्य संख्या १२६ पेक्षा अधिक नसेल.

  • ३) १२ लाखांपेक्षा अधिक व २४ लाखांपर्यंतच्या लोकसंख्येकरता किमान १२६ सदस्य संख्या निश्चित करण्यात आली. १२ लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक ४० हजार इतक्या लोकसंख्येसाठी १ अतिरिक्त सदस्याची तरतूद असून कमाल संख्या ही १५६ पेक्षा अधिक नसेल.

  • ४) २४ लाखांपेक्षा अधिक व ३० लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या महानगर पालिकेची सदस्य संख्या १५६ निश्चित करण्यात आली. त्याच प्रमाणे २४ लाखांपेक्षा अधिक असलेल्या ५० हजार इतक्या लोकसंख्येसाठी १ अतिरिक्त सदस्य असेल. कमाल सदस्य संख्या ही १६८ इतकी असेल.

  • ५) ३० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येसाठी किमान सदस्य संख्या १६८ इतकी निश्चित असून ३० लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक १ लाख लोकसंख्येसाठी १ अतिरिक्त सदस्याची तरतूद करण्यात आली. कमाल सदस्य संख्या ही १८५ पेक्षा अधिक नसेल.

महाविकास आघाडीसाठी सोयीचे

शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसची महाविकास आघाडी आहे. यात इतरही काही घटक पक्षांचा समावेश आहे. महानगर पालिकेच्या निवडणुका आघाडी करून लढण्यावरून तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ व स्थानिक नेत्यांमध्ये मतभेद आहे. सदस्य संख्या वाढल्याने सर्वच घटक पक्षांना काही जागा देणे सोयीचे ठरणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे बंडखोरी टाळण्याचा हेतू महाविकास आघाडीतील नेत्यांचा असल्याचे बोलल्या जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT