Railway Workers in Strike: जुनी पेंशन योजनेचा बचाव करण्यासाठी आणि आयुध निर्माणींचे केले जात असलेले कॉर्पोरेटीकरण रोखण्यासाठी मार्च महिन्यात रेल्वे कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात रेल्वेची चाके थांबली तर केंद्र सरकारसाठी डोकेदुखी ठरू शकते. सध्या रेल्वे संघटनांचा संप सुरू आहे.
भविष्यातील लढा आणि अन्य विषयांसंदर्भात वाडी येथे नुकतीच रेल्वे युनियनच्या पदाधिकऱ्यांची बैठक पार पडली. यामध्ये केंद्र सरकारकडून स्पष्ट आश्वासन न मिळाल्यास संपाचे हत्यार उपसण्याचे संकेत दिले आहेत. रेड युनियनच्या प्रयत्नांमुळे आयुध कामगार सुरक्षित आहेत. उद्योगपतींच्या दबावाखाली केंद्रातील सरकारने २०० वर्षांचा इतिहास असलेल्या ४१ शस्त्रास्त्रे कारखान्यांचे कॉर्पोरेटीकरण केले आहे. याविरोधात संघटित होऊन लढणे गरजेचे आहे, असे मत ‘एआयडीईएफ’चे राष्ट्रीय अध्यक्ष कॉ. एस.एम. पाठक यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.
८ जानेवारी ते ११ जानेवारी या कालावधीत ‘एआयडीईएफ’शी संलग्न संघटना देशभरातील आपापल्या मुख्यालयासमोर उपोषण करत आहेत. कारण सध्या लढा सरकारशी होणार आहे आणि नोव्हेंबर महिन्यात झालेल्या मतदानात संपाच्या बाजूने ९७ टक्के मतदान झाले आहे. रेल्वेत संपाची तारीख निश्चित केली जाणार असून जुनी पेन्शनसाठी मार्च २०२४ मध्ये बेमुदत संपाची घोषणा केली जाऊ शकते, असे पाठक म्हणाले. (Latest Marathi News)
लाल ध्वज ही संरक्षण खात्यातील सर्वात मोठी संस्था आहे, हेही सरकारने पाहिले, त्यामुळे लाल ध्वजाच्या उपस्थितीत सरकार आपली चुकीची धोरणे कामगारांवर लादू शकत नाही, अशी भीती सरकारला वाटते. त्यामुळे सरकारला जानेवारी महिन्यात युनियन सदस्यत्वाची पडताळणी करायची आहे. कारण पडताळणीत एआयडीईएफची ताकद कमी होईल, असे सरकारला वाटते. त्यामुळे कामगारांनी सहकार्य करणे आवश्यक असल्याचे पाठक म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.