नागपूर

'धारावीच्या माध्यमातून मुंबई अदानीला दान'! षडयंत्राचा काँग्रेस आमदाराचा आरोप, विरोधकांचा प्रस्ताव सादर

धारावी झोडपट्टीच्या पुनर्वसनाचे कंत्राट देऊन अदानी यांना संपूर्ण मुंबईच दान देण्याचे षडयंत्र राज्य सरकारने रचले असल्याचा आरोप काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत केला.

सकाळ डिजिटल टीम

Latest Marathi News: धारावी झोडपट्टीच्या पुनर्वसनाचे कंत्राट देऊन अदानी यांना संपूर्ण मुंबईच दान देण्याचे षडयंत्र राज्य सरकारने रचले असल्याचा आरोप काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत केला.

विरोधकांच्यावतीने सादर करण्यात आलेल्या प्रस्तावावर त्यांनी अदानी यांना धारवीच्या विकासासाठी देण्यात आलेल्या सोयी, सवलती, त्यामुळे कंपनीला होणारा फायदा याची आकडेवारीसह सविस्तर माहिती दिली. जी जमीन सरकारी ती अदानीची असाही आरोप त्यांनी केला.

हा अदानी विकास आहे की मुंबईची लूट असाही प्रश्न त्यांनी सरकारला केला. अदानींच्या कंपनीला धारावीतील १६० हेक्टेर क्षेत्राच्या विकासासाठी १०.६ एफएसआय देण्यात आला. तेवीसशे कोटींची ही निविदा असून एक लाख कोटीनी अदानीचा फायदा होणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

आमदार शेलारांचे प्रत्युत्तर
भाजपच्यावतीने आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर देताना ही सर्व प्रक्रिया उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या काळात झाल्याचे सांगितले. मुंबईचा विकास होऊ नये अशीच आणि जे काही होईल ते आपल्याच माध्यमातून व्हावे, अशीच भूमिका उबाठाची आहे. त्यामुळे प्रत्येक विकासाच्या प्रकल्पाला विरोध केला जात आहे.

मग तो धारावी असो की आरे कारशेड असो. महाविकास आघाडीच्या कार्यकाळतही ५०० चौरस फुटाचे घर झोडपट्टीधारकांना देण्याचा उल्लेख नव्हता. मात्र आता सत्ता नसल्याने महाविकास आघाडीचे नेते यास विरोध करीत असल्याचे आशिष शेलार म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT