Ramdas Athawale esakal
नागपूर

Mahayuti Party : महायुतीतील पक्षांची जागांसाठी भांडणे; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा घरचा आहेर

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - विधानसभा निवडणुकीत आम्हाला ८ ते १० जागा हव्या आहेत. परंतु अद्याप जागांसंदर्भात आमच्यासोबत कोणतीही चर्चा झाली नाही. महायुतीतील तिन्ही पक्ष जागांसाठी भांडत आहेत, असे आरपीआयचे (आठवले गट) नेते, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

आठवले म्हणाले, ‘मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने आम्हाला पाच जागा दिल्या होत्या. परंतु चिन्ह भाजपचे होते. उमेदवारही त्यांचे होते. परंतु यंदा आम्ही आमच्याच चिन्हावर लढू. दोन राज्यांत आमचे आमदार आहेत.

आणखी दोन राज्यांत उमेदवार आल्यास राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेल. विदर्भातून उत्तर नागपूर व उमरखेड विधानसभेची जागा आम्हाला हवी आहे. इतरही काही जागा पाहिजे. सध्या तरी महायुतीतील तिन्ही पक्ष जागांसाठी भांडताहेत.’

#ElectionWithSakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaja Munde: दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंकडून लक्ष्मण हाकेंचा "गोंडस लेकरू" म्हणून उल्लेख

Ranji Trophy 2024: जम्मूचा शुभम महाराष्ट्रावर पडतोय भारी; एकट्याने डाव उभारला अन् ठोकले दणदणीत द्विशतक

Uddhav Thackeray Dasra Melava: दसरा मेळाव्याच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईतील 'हे' रस्ते असणार बंद!

Dussehra Melava 2024 Live Updates: "नाहीतर तुम्हाला उलथे केल्याशिवाय राहणार नाही," जरांगेंचा सराकरला इशारा

सांगलीच्या जागेसाठी 'या' दोन नेत्यांत रस्सीखेच; विश्वजित कदम, विशाल पाटलांकडे कार्यकर्त्यांनी केली 'ही' मागणी

SCROLL FOR NEXT