Devendra Fadanvis  sakal
नागपूर

Devendra Fadnavis : पुढील पाच वर्षे महायुतीच सत्तेत : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : महायुतीचे सरकार पुढील पाच वर्षे सत्तेत राहील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यांनी महायुती सरकारच्या विकासकामांचा उल्लेख करत विरोधकांच्या खोट्या नॅरेटिव्हवर टीका केली.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे असते तर आपल्याला प्रचंड संघर्ष करावा लागला असता. आज विधानसभेचा निकाल आपल्या बाजूने दिसत आहे. त्यासाठी महायुती सरकारच्या काळात झालेली विकासकामे कारणीभूत आहेत.

आपण राज्याच्या विकासाचे आणि सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे पुढची पाच वर्षे आपलेच सरकार येणार आहे, असे सांगत एकनाथ शिंदे व अजित पवार यांना सोबत घेत सरकार स्थापन करण्याचे कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मंगळवारी रेशीमबाग भट सभागृहात आयोजित भाजपच्या कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. लोकसभेच्या निवडणुकीतील विरोधकांचे खोटे नॅरेटिव्ह मतदारांच्या लक्षात आले आहे.

जो समाज आणि शेतकरी भाजपच्या विरोधात गेला होता त्यांना चूक आता लक्षात आली आहे. संविधान कुणी बदलू शकते, ही भीती आता जनतेच्या मनातून निघून गेली आहे. त्यामुळे दलित व आदिवासी बांधव महायुतीबाबत सकारात्मक झाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान शेतकऱ्यांचे काही प्रश्न होते, ते केंद्र व राज्य सरकारने सोडवले आहेत. एकंदरीत विधानसभेची निवडणूक महायुतीसाठी परिवर्तनाची नांदी ठरणार असल्याचा विश्वास यावेळी फडणीस यांनी व्यक्त केला.

बुथ प्रमुख, शक्ती प्रमुखांवर निवडणूक सोडू नका

आरोप करणे आणि खोटे नॅरेटिव्ह निर्माण करणे हे विरोधकांचे कामच आहे. ते प्रत्येकच गोष्टीत नकारात्मकता शोधत असतात. आता आपणही त्याची माहिती घेऊन प्रत्त्युतर दिले पाहिजे. २०१४च्या निवडणुकीत भाजपने विदर्भातील ४२ जागा जिंकल्या होत्या. तीच परिस्थिती आज आहे. हीच ग्राऊंड रिॲलिटी आहे. आता फक्त नेत्यांनी निवडणुकीची जबाबदारी घेतली पाहिजे. बुथ प्रमुख, शक्ती प्रमुखांवर निवडणूक सोडून देऊ नका, असे आवाहन करून फडणवीस यांनी आपण पुन्हा महाराष्ट्र जिंकू शकतो, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

तर प्रचंड संघर्ष करावा लागला असता

राज्यात पाच वर्षे भाजपचे सरकार होते. या दरम्यान अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. महाराष्ट्रासह विदर्भाच्या विकासासाठी अनेक योजना सुरू केले होत्या. मात्र महाविकास आघाडीने ते बंद पाडण्याचे काम हाती घेतले होते. भाजपच्या नेत्यांचे खच्चीकरण सुरू केले होते. पाच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार कायम राहिले असते तर आगामी विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला असता. परंतु आता आपल्या बाजूने जनता दिसतेय. पुढची पाच वर्षे आपलीच सत्ता राहणार आहे. महायुतीचे सरकार आल्याचा फायदा मिळणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: उड्डाणादरम्यान नरेंद्र मोदींच्या विमानात तांत्रिक बिघाड, ऐन प्रचारादरम्यान विमानतळावरच अडकून पडले!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Sharad Pawar: शरद पवार यांची पुन्हा भर पावसात सभा, म्हणाले- अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते अन्....

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT