man died due to corona after his parents in nagpur 
नागपूर

मित्रांनो मी येतो म्हणाला अन् कायमचाच झोपी गेला; वडिलांपाठोपाठ मुलाचाही मृत्यू

योगेश बरवड

नागपूर : शेजारी, मित्र अडचणीत असले की तो हमखास मदतीला यायचा. मदतीला मर्यादा असल्या तरी धीर निश्चितच द्यायचा. यामुळेच दोस्तांचा दोस्त म्हणून तो अख्खी वस्ती आणि मित्रांच्या गळ्यातील ताईत होता. अचानक कोरोनाने घात करीत या मित्राला हिरावून नेले. दिलदार मित्राला खांदाही न देता आल्याने अवघा मित्रपरिवार हळहळला. मुलगा रुग्णालयात असल्याने आठच दिवसांपूर्वी त्याच्या वडिलांचेही निधन झाले होते. अल्पावधितच त्याच्या कुटुंबासाठी हा दुसरा धक्का ठरला. 

पवन खराबे, असे या मित्राचे नाव. वस्तीतील सामाजिक उपक्रमांमध्ये तो हिरीरीने सहभागी व्हायचा. अलीकडेच काही अंतरावरच नविन घर बांधून आई-वडील, पत्नी, दोन लहानग्या मुलींसोबत राहायला गेला होता. कधी नव्हे तो यंदाच्या होळीत घरीच होता. पॉझिटिव्ह येताच मेडिकलमध्ये भरती झाला. एकटाच मुलगा, तोही रुग्णालयात, अनेक दिवस कोणतीच माहिती नाही या तणावामुळे वडिलांचे अकस्मात निधन झाले. मित्रांनीच अंत्यसंस्कार केले. त्याला याबाबत कळणार नाही याची काळजी घेण्यात आली होती. लवकरच येतो मित्रांनो, ही त्याची व्हॉट्सअ‌ॅप पोस्ट दिलासा देणारी होती. पण, मंगळवारी त्याच्या मृत्यूचीच वार्ता आली आणि अवघा मित्र परिवार हळहळला. न कळत्या वयात पवनच्या दोन्ही मुली वडिलाच्या प्रेमाला पोरक्या झाल्या ही जाणीव साऱ्यांनाच चटका लावून गेली. 

दुपारी आपली बसमधून कोरोना रुग्णाचे एकाच वेळी पाच शव गंगाबाई घाटावर आणले गेले. त्यातील पवनचा मृतदेह बाहेर काढताच साऱ्यांच्याच संयमाचा बांध फुटला. शोकाकूल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT