Man end life of a boy in Nagpur Crime News  
नागपूर

क्षुल्लक वाद अन् भरचौकात मांडीवर चाकूनं केला वार; वाचून तुमच्याही अंगाचा उडणार थरकाप  

योगेश बरवड

नागपूर ः  क्षुल्लक वादातून युवकाचा खून करण्यात आला. गुरुवारी दुपारी जुना कामठा मार्गावर अनेकांच्या डोळ्यादेखत ही थरारक घटना घडली. आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली आहे.

करण अशोक वर्मा (२६) रा. कटरे ले-आउट, गणेशनगर, कळमना वस्ती असे मृताचे तर फैजान मैसुरी (१८) रा. भवानीनगर, कळमनावस्ती असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार करण हा खसगी काम करायचा. फैजान जुना कामठी रोड येथे फेब्रीकेशनचे काम करीत असून गुन्हेगारीवृत्तीचा आहे. मागच्याच महिन्यात त्याला पिस्तूलसह शांतीनगर भागातून अटक करण्यात आल्याची माहिती आहे. 

गुरुवारी दुपारी या भागात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात आली. फैजानच्या दुकानापूढे चिकनचे दुकान आहे. पथक येण्यापूर्वी सामानाची आवराआवर सुरू होती. तेवढ्यात चिकन सेंटरचालकाने फैजानला बोलावून चहा आणून देण्याची विनंती केली. तो दुचाकीने चहा घेण्यासाठी पोटे रेस्टॅरेंटमध्ये जात होता. त्याचवेळी मृतक आपल्या दुचाकीने जात होता. रेस्टॉरेंटकडे वळताना फैजानच्या वाहनाचा धक्का करणच्या वाहनाला लागला. त्यावरून दोघांमध्ये वाद उद्‍भवला. 

वाद वाढत असतानाच करणने पडलेला दगड उचलून फैजानवर उगारला. यामुळे फैजान अधिकच चिडला. जवळचा चाकू काढून करणच्या डाव्या मांडीवर खुपसला. तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळताच फैजान पळून गेला. घटनेनंतर परिसरात बघ्यांची गर्दी उसळली. घटनेची माहिती मिळताच कळमना पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. 

तातडीने करणला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मध्यरात्रीनंतर १ वाजता त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनेनंतर काही वेळातच आरोपीला अटक केली होती. करणचा मृत्यू होताच कळमना पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली. 

संपादन - अथर्व महांकाळ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT