poppy seeds  sakal
नागपूर

Poppy Seeds : खसखस महागली! मणिपूर हिंसाचाराचा आयातीवर परिणाम, गृहिणींची चिंता वाढली

मणिपूर हिंसाचाराचा फटका; सावजी हॉटेलमधून खसखसची भाजी झाली गायब

सकाळ डिजिटल टीम

नागपूर - सावजी भोजनालयात हमखास मिळणारी भाजी म्हणजे खसखशीची लज्जतदार रस्सा भाजी. मणिपूरमधील हिंसाचारामुळे खसखसची आवक प्रभावित झालेली आहे. त्यामुळे खसखसच्या दरातही विक्रमी वाढ झालेली आहे.

खसखस प्रतिकिलो १२०० ते १५०० रुपये झाली आहे. परिणामी, खसखसीची भाजी हॉटेलमधून गायब झालेली आहे.

विशेष म्हणजे दोन वर्षानंतर झालेली ही सर्वाधिक दरवाढ आहे. देशातील अफू उत्पादनावर केंद्र सरकारचे निर्बंध असून अफूप्रमाणेच सहउत्पादन असलेल्या खसखशीवरही काही निर्बंध आहेत. देशात मागणी मोठी असली तरी निर्बंधांमुळे मोठ्या प्रमाणावर खसखशीचे उत्पादन देशात घेतले जात नाही.

त्यामुळे चेकोस्लोव्हाकिया, तुर्कस्तान, चीनमध्ये उत्पादित होणाऱ्या खसखशीवर भारताची भिस्त आहे. वास्तविक पाहता अफूचे उत्पादन देशातील मध्य प्रदेश, राजस्थान, मणिपूर आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यांत घेतले जाते. त्यासाठी परवानगी घेणे गरजेचे असते. अफूचे सहउत्पादन (बायप्रॉडक्ट) असलेल्या खसखशीवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. काही औषधांमध्ये अफूचा वापर केला जातो.

तसेच भारतीय खाद्यसंस्कृतीत खसखशीचा वापरही मोठ्या प्रमाणावर केला जातो. केंद्र सरकारने तुर्कस्तानवरून १९ हजार टन खसखस आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फटका मध्यप्रदेशातील खसखस उत्पादक नेमची आणि मंदसोर येथील शेतकऱ्यांना बसत आहे.

भारतीय खाद्यपदार्थांत खसखस वापरतात. पण देशांतर्गत होणारे खसखशीचे उत्पादन मागणीच्या तुलनेत अपुरे पडते. व्यापाऱ्यांनी सांगितल्यानुसार आयातीवरील निर्बंध उठल्यास खसखसच्या दरात घट होऊ शकते.

तुर्कस्तानमधील खसखस ​​तेथे उत्पादित होत नाही. ती पाकिस्तानच्या वायव्य सरहद्द प्रांतातून आणली जाते. जेथे अफूचे अवैध उत्पादन केले जाते असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच त्या देशातून खसखस स्वस्तात भारतात येते. सध्या आयातीवर थोडे निर्बंध आले असताना आवक कमी झाल्याने भाव वाढू लागले आहेत.

खसखसचा उगम

खसखसचा उगम हा युरोप, भूमध्य समुद्री प्रदेश, रशिया, इजिप्त, युगोस्लाव्हिया, पोलंड, जर्मनी, नेदरलॅन्ड, चीन, जपान, अर्जेंटिना, स्पेन, बल्गेरिया, हंगेरी, पोर्तुगालमध्ये आहे. या देशात खसखसचा उपयोग हा औषधांमध्ये केला जातो; मात्र म्यानमार, थायलंड, लाओस, अफगाणिस्तान, तुर्कस्तान, पाकिस्तान, इराणमध्ये मसाल्यात वापर केला जातो.

खसखस ही समशीतोष्ण, उष्ण कटिबंधीय देशात घेतली जाते. खसखस ही अफूच्या बोंडांमध्ये (ओपियम) मिळते. औषधी गुणधर्म असलेल्या खसखसपासून अफूही बनविली जाते.

खसखसचे फायदे

सर्दी-खोकला, हृदयविकार, उलट्या, त्वचाविकार, ताप, धातूची विषबाधा, डोकेदुखी, रक्ताचे विकार, लघवीची जळजळ, श्‍वसनाचे आजार, पित्ताचे आजार, स्नायू दुखणे, हार्मोनल समस्या यांवरही खसखस ​​फायदेशीर आहे.

खसखसची आयात कमी झालेली आहे. मध्यप्रदेशात पावसा अभावी उशिराने खसखसची लागवड करण्यात आल्याने सप्टेंबर महिन्याऐवजी ऑक्टोबर महिन्यात खसखस बाजारात येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भाव वाढलेले आहे. मणिपूरमधील अस्थिरतेमुळे तेथून आणि नेपाळहून येणारी खसखसची आवक कमी झाल्याने भाव वाढले आहे.

-किरण दप्तरी,ड्रायफ्रुट विक्रेता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT