नागपूर ः घरी भाड्याने राहायला आलेल्या युवकाशी विवाहित घरमालकीणचे सूत जुळले. काही दिवसांतच दोघांचे एकमेकांवर जिवापाड प्रेम जडले. मात्र गैरसमज झाल्याने प्रियकराने अबोला धरला. त्यामुळे प्रेयसीने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना बेलतरोडीत घडली. धनश्री राऊत (३४, घोगली) असे आत्महत्या केलेल्या प्रेयसीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनश्रीचा पती सुजित हा मनपात नोकरीवर आहे. त्यांना दोन मुले आहेत. तो २०१६ मध्ये वकीलपेठेत राहत होते. त्यावेळी त्यांच्याकडे योगेश नावाचा युवक हा भाडेकरू म्हणून राहत होता. घरमालकीण धनश्रीकडे तो किरायाचे पैसे देत होता. पती सुजित हा कामानिमित्त नेहमी बाहर राहत होता. त्यामुळे त्याचे घराकडे दुर्लक्ष होत होते.
दरम्यान अविवाहित असलेल्या योगेशवर धनश्रीची नजर गेली. दोघांचे सूत जुळले. दोघांचे मोबाईलवर तासनतास बोलणे सुरू झाले. पती घरी नसताना योगेश घरी यायला लागला. दोघांची घट्ट मैत्री झाली. योगेश आणि धनश्री यांचे प्रेमसंबंध सुरूच होते. सुजित कामावर गेला की, योगेश तिच्या घरी येत होता. दोघेही दिवसभर घरात सोबत राहत होते.
पतीला लागली कुणकूण
योगेश वारंवार घरी येत असल्यामुळे तिच्या पतीला संशय आला. त्याने दोघांवर बारीक लक्ष ठेवले. कामावर गेल्याचे नाटक करीत तासाभरात घरी परत आल्यानंतर दोघांनाही नको त्या अवस्थेत पकडले. त्यामुळे त्याने योगेशला घर सोडण्यास सांगितले. त्यानंतर सुजितने घोगलीत घर बांधले आणि राहायला गेले.
दोघांत झाला वाद
घर बदलल्यानंतरही दोघांचे प्रेमसंबंध सुरूच होते. तेथील घरीसुद्धा योगेश येत होता. शेवटी कंटाळून धनश्रीच्या पतीने दोन मुलांकडे बघून दोघांच्या प्रेमाकडे दुर्लक्ष केले. काही दिवसांपूर्वी धनश्री आणि योगेश यांच्यात वाद झाला. त्याने अबोला धरला. तेव्हापासून ती निराश झाली होती. ‘आता जगण्यात काहीच अर्थ नाही’ असे ती पतीकडे बोलून दाखवायची.पतीने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास धनश्रीने प्रियकराचा विरह सहन न झाल्याने घरी विष प्राशन केले. तिला पतीने मेडिकलमध्ये भरती केले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
संपादन - अथर्व महांकाळ
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.