hearse sakal
नागपूर

Hearse : एकाही वैद्यकीय महाविद्यालयात नाही शववाहिका; मृताच्या कुटूंबीयांकडूनच घेतले जाते प्रवासभाडे

व्हीआयपीच्या ताफ्यात रुग्णवाहिका आरक्षित केली जाते, मात्र सामान्यांच्या मृत्यूनंतर देहदानासारखे सत्कर्म करण्यासाठी निघालेल्या परिवाराच्या वाट्याला ‘शववाहिका’ मिळत नाही.

केवल जीवनतारे

नागपूर - व्हीआयपीच्या ताफ्यात रुग्णवाहिका आरक्षित केली जाते, मात्र सामान्यांच्या मृत्यूनंतर देहदानासारखे सत्कर्म करण्यासाठी निघालेल्या परिवाराच्या वाट्याला ‘शववाहिका’ मिळत नाही. नव्हेतर राज्यातील एकाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शववाहिका नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. यामुळे देहदानासाठी पदरचे पैसे खर्च करून मेयो, मेडिकलमध्ये मृतदेह पोचवला जातो.

देहदानानंतर रुग्णवाहिकेचे भाडे म्हणून हजार-पंधराशे रुपये नातेवाइकांच्या हातावर ठेवले जातात, ही देहदान चळवळीतील मोठी शोकांतिका आहे. देहदान हे पवित्र व आवश्यक कार्य आहे. अलीकडे अवयवदानासह देहदानासंदर्भात जनजागृती होत आहे, मात्र नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर घरी असलेला मृतदेहाचे दान करावयाचे असल्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे संबंधितांचा मृतदेह आणण्यासाठी शववाहिकेची गरज असते.

मात्र उपराजधानीतील मेडिकल, मेयोसह, एम्स आणि डागा या सर्व शासकीय रुग्णालयांत शववाहिका नसल्यामुळे देहदान करताना अडचणी निर्माण होतात. खासगी रुग्णवाहिकेतून मृतेदह आणावा असा सल्ला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून संबंधित डॉक्टर देतात.

मेयो, मेडिकलमध्ये शववाहिका नाहीच, परंतु एम्ससारख्या केंद्राच्या आरोग्य संस्थेकडेही शववाहिका नाही. विशेष असे की, एम्समध्ये देहदानासाठी आणलेला मृतदेह पोचवून दिल्यानंतर लगेच रुग्णवाहिका परत जाते. मात्र देहदानाचे पवित्र कार्य केल्यानंतर घरी परत जाताना त्यांना एम्समध्ये कोणतेही वाहन उपलब्ध नसते. दुःखी नातेवाईक सुमारे तीन किमी पायपीट सहन करत वर्धा मार्गावर येतात.अशावेळी १०८च्या धर्तीवर वाहन उपलब्ध करून या शोकांतिकेचा अंत करावा.

- रमेश सातपुते, सदस्य, शासकीय देहदान समिती.

रुग्णवाहिकेतून पोचवला जातो मृतदेह

मेयो, मेडिकलसह एम्समध्ये शववाहिका नसल्यामुळे मृतदेह पोचवण्यासाठी रुग्णवाहिकांचा पर्याय वापरला जातो. परंतु रुग्णवाहिका चालकांकडून रुग्ण, नातेवाइकांची पिळवणूक टाळण्यासाठी रुग्णवाहिकांचे दर निश्‍चित करण्याची गरज आहे.

उपराजधानीत रुग्णांना लुटणाऱ्या रुग्णवाहिकांचे ‘पोस्ट मार्टेम’ करण्यासाठी परिवहन विभागाने समोर यावे. ही लुट थांबवण्यासाठी रुग्णालय परिसरात दरफलक लावण्याची गरज आहे. अव्वाच्या सव्वा भाव सांगून रुग्णांच्या नातेवाइकांची अक्षरशः लुट

ॲम्बुलन्सच्या धर्तीवर असावी सुविधा

राज्यात १०८ क्रमांकाची ॲम्बुलन्स सुविधा सुरू केल्यामुळे अनेक जिल्हा व ग्रामीण रुग्णालयापासून तर प्राथमिक आरोग्य केंद्रातून मेडिकल, मेयोसह एम्समध्ये रुग्णाला मोफत आणले जाते. पण रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर मृतदेह नेण्यासाठी कोणतीही सोय शासनाने केलेली नाही.

नागपुरातून चंद्रपूर, भंडारा येथे मृतदेह नेण्यासाठी तीन हजार रुपये मोजावे लागतात. यामुळेच १०८ क्रमांकाच्या धर्तीवर शासनाने शववाहिका सुरू करण्याची मागणी मेडिकलमधील देहदान समितीचे सदस्य रमेश सातपुते यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

Nashik Vidhan Sabha Election : ‘महायुती-महाविकास’चे अपक्ष उमेदवारांवर लक्ष; वरिष्ठ नेत्यांकडून अपक्ष उमेदवारांशी संपर्क

Nanded Assembly Election 2024 : जातीय मतविभाजनाचा फटका कोणाला बसणार?

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

SCROLL FOR NEXT