men in nagpur earn crore by just investing 15 thousand Nagpur news  
नागपूर

Success Story: केली अवघ्या १५ हजारांची गुंतवणूक अन् झाले कोटींचे मालक; युवा उद्योजकांची गगनभरारी 

नरेंद्र चोरे

नागपूर: आयुष्यात उंच झेप घेण्यासाठी परिस्थिती कधीच आडकाठी होऊ शकत नाही. ठराविक लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून प्रामाणिक मेहनत केल्यास गावखेड्यातला साधारण शिकलेला तरुणही यशस्वी उद्योजक होऊ शकतो. खानगांव (ता. काटोल) येथील पंकज कुमेरिया व नितीन बऱ्हैया या वैदर्भी युवकांनी ते सिद्ध करून दाखविले. केवळ बारावीपर्यंत शिकलेल्या या पंचविशीतील तरुणांनी अवघ्या चार-पाच वर्षांत साहसी क्रीडा साहित्य निर्मितीचा व्यवसाय देशभर पसरवत १५ हजारांवरून १८ कोटींपर्यंत नेला. त्यांनी केवळ स्टार्टअप व 'मेक इन इंडिया' सारख्या प्रकल्पांनाच हातभार लावला नाही, तर नोकरीच्या मागे धावून आपला उमेदीचा काळ फुकट घालविणाऱ्या वैदर्भी तरुणांसाठीही ते प्रेरणास्रोत ठरले आहेत.

बिहारमधील 'स्काय वॉक'च्या निमित्ताने प्रकाशझोतात आलेले हे शेतकरीपूत्र एकाच गावचे. जि. प. शाळेत शिकले असून, केवळ बारावी पास आहेत. केंद्र सरकारच्या (पोस्ट ऑफिस) नोकरीवर पाणी सोडणाऱ्या पंकजकडे दोन एकर शेती आहे, तर नितीनकडे चार एकर. कामापूरते शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या भानगडीत न पडता काहीतरी वेगळे करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. घरच्यांनीही त्यांना सहकार्य केले. जुनेवानी येथे ‘ऍडव्हेंचर कॅम्प’ चालविणारे शिक्षक भुदेव बहुरूपी यांनी दिशादर्शन केल्यानंतर मार्ग दाखवला दोघेही घराबाहेर पडले. 

सुरुवातीला इंटरनेटवर सर्च करून विविध व्यवसायांबद्दलची माहिती गोळा केली. सर्व अभ्यास केल्यानंतर अखेर आपल्या आवडीच्या ‘ऍडव्हेंचर’ क्षेत्रात पुढे जाण्याचे त्यांनी ठरविले. जवळपास दहा ते पंधरा हजार रुपये गुंतवून सप्टेंबर २०१५ मध्ये ‘नेल इंडिया ॲडव्हेंचर प्रा. लि.’ ही कंपनी स्थापन केली. हळूहळू ग्राहकांचा प्रतिसाद मिळत गेला, तसे कार्य विस्तारत गेले आणि उत्पन्नतीह वाढ झाली.

नागपुरात कनेक्टिव्हिटी व कच्च्या मालाची अडचण जाणवू लागल्याने तसेच व्यवसायाचे विस्तारीकरण करण्याच्या उद्देशाने २०१८ मध्ये पुण्याजवळील भीमा कोरेगाव येथे कारखाना सुरू केला. त्याचवेळी काटोलमधील कारखाना अन्य मित्रांच्या स्वाधीन करून त्यांनाही कामात गुंतविले. पंकज व त्याच्या मित्राच्या कारखान्यात ‘ॲडव्हेंचर पार्क’ मध्ये लागणाऱ्या साहसी क्रीडा साहित्याची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होऊ लागली. व्यवसाय वाढत गेला. देशभरातून साहित्याची मागणी वाढली. हवेत चालणाऱ्या सायकलपासून ते रॉकेट इंजेक्शनपर्यंत आणि स्काय रोलर ते रोलर कोस्टरपर्यंत असंख्य दर्जेदार ‘ॲडव्हेंचर प्रॉडक्ट्स’ ची निर्मिती सुरू केली. भारतात एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर साहित्यांची निर्मिती कुठेही होत नसल्याचे पंकजने सांगितले. 

कल्पनाशक्तीच्या जोरावर नवनवीन साहित्य तयार करून त्या देशभर विकले. आजच्या घडीला भारतात कंपनीच्या शंभरापेक्षा अधिक साईट्स आहेत, हे उल्लेखनीय. दुबई व युगांडासारख्या देशातही साहित्यांची निर्यात केली आहे. त्यामुळेच १५ हजार रुपयांत सुरू केलेला हा व्यवसाय १८ कोटींच्या घरात पोहोचू शकला.

पंकज व नितीनच्या कंपनीत तज्ज्ञांची प्रॉडक्शन, रिसर्च, इंस्टॉलेशन व मार्केटिंग टीम आहे. त्यांच्या भरवशावरच एवढे साम्राज्य उभे करू शकल्याचे पंकज मोठ्या मनाने कबूल करतो. कंपनीच्या माध्यमातून त्याने व्यसनाच्या आहारी गेलेल्या अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून दिला आहे. भविष्यात ‘व्हर्चुअल रिऍलिटी गेमिंग झोन’ मध्ये उतरणार असल्याचे अनेक पुरस्कार जिंकणाऱ्या पंकजने सांगितले.

'अनेक तरुण सरकारी नोकरी किंवा एखादा प्रायव्हेट 'जॉब' मिळविण्यासाठी शिक्षण घेतात.नोकरी लागली नाही की निराश होतात. पण आम्ही नोकरीसाठी कधीच शिकलो नाही. आम्हाला आयुष्यात वेगळं काही करायचं होतं. त्यामुळेच उद्योग क्षेत्र निवडले. आमच्या मते, यशस्वी उद्योजक होण्यासाठी भांडवल नव्हे, प्रामाणिकपणे मेहनतीची खरी गरज असते'
-पंकज कुमेरिया आणि नितीन बऱ्हैया 
(युवा उद्योजक)

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vadgaon Sheri Assembly Election 2024 Result Live: वडगाव शेरी मतदारसंघात तुतारी वाजली; बापू पठारेंचा 5000 मतांनी विजयी

Devendra Fadnavis : फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एक है तो 'सेफ' है!

Karad South Assembly Election 2024 Results : कऱ्हाड दक्षिणेत काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग! पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव करत अतुल भोसलेंचा मोठा विजय

Madha Assembly Election 2024 Result Live: माढ्यात तुतारीची गर्जना, अभिजित पाटील यांचा दणदणीत विजय

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

SCROLL FOR NEXT