Meteorological Department sakal
नागपूर

Meteorological Department : पावसाचा बिनचूक अंदाज केव्‍हा?;हवामान विभागाच्या चुकीच्या भाकितांमुळे शेतकऱ्यांना फटका

नरेंद्र चोरे : सकाळ वृत्तसेवा

नागपूर : भारत हा कृषिप्रधान देश असल्याने, आपली अर्थव्यवस्था मुख्यत्वे शेतीवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना हवामानाविषयी बिनचूक माहिती मिळणे अपेक्षित आहे. मात्र देशात तसे होताना दिसत नाही. हवामान विभागाचे बहुतांश अंदाज चुकीचे ठरत असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. पैसा, हवामानतज्ज्ञ, तंत्रज्ञान सर्वकाही उपलब्ध असूनही, दुर्दैवाने त्याचा शेतकऱ्यांना फायदा होताना दिसत नसल्याचे निराशाजनक चित्र सध्या विदर्भासह संपूर्ण देशात आहे.

आजच्या घडीला अमेरिका, इंग्लंड व इजरायलसारख्या प्रगत देशांमध्ये अचूक तंत्रज्ञान आहे. त्यामुळे तेथील हवामानाचे अंदाज बिनचूक असतात. अमक्यावेळी पाऊस येणार म्हटले की, हमखास त्याचवेळी पाऊस पडतो. भारतातील चित्र मात्र याउलट आहे. आपल्या देशात पाऊस येणार म्हटले की लख्ख ऊन पडते, आणि ऊन पडणार म्हटले की, धुवांधार पाऊस बरसतो. मुळात पावसाविषयी अचुक भाकीत करणारे तंत्रज्ञानच आपल्याकडे उपलब्ध नाही. हवामान विभागाचे अंदाज चुकीचे ठरत असल्याने साहजिकच शेतकऱ्यांची फसगत होते. खरं तर येथील शेती ही प्रामुख्याने पूर्णपणे मॉन्सून व निसर्गाच्या भरवशावर आहे.

अशा परिस्थितीत हवामान विभागाची भूमिका निर्णायक ठरते. त्यांच्या अंदाजावर विश्वास ठेवूनच शेतकरी आपल्या कामांचे नियोजन करतो. पाऊस नेमका केव्हा येणार किंवा येईल की नाही, हे शेतकऱ्यांना बिनचूक सांगणे खूप गरजेचे आहे. दुर्दैवाने आजच्या घडीला तशी यंत्रणा किंवा तंत्रज्ञानच आपल्या देशात नाही. हवामान विभागाचे अंदाज वारंवार फोल ठरत असल्यामुळे अनेकदा शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येते व पर्यायाने आर्थिक नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी हवामानाविषयी बिनचूक अंदाज वर्तविणाऱ्या तंत्रज्ञानाची आज देशाला खऱ्या अर्थाने गरज आहे. यासंदर्भात चंद्रपूरचे हवामान अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांचे मत जाणून घेतले असता ते म्हणाले,

बिनचूक पावसाचा अंदाज केव्‍हा?

अमेरिकेसारख्या देशांमध्ये हवामानाविषयी अंदाज वर्तविणारे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यांचे सॅटेलाईट व रडार यंत्रणा सर्वोत्तम आहे. याच कारणांमुळे त्यांचे अंदाज शंभर टक्के खरे ठरत असतात. आपल्याकडे अजूनही काही ठिकाणी जुनाट ब्रिटिशकालीन ‘वेदर स्टेशन्स’ आहेत.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, भारतातील हवामान खूपच ‘अनप्रेडिक्टबल’ आहे. त्यामुळे पावसाविषयी नेमका अंदाज किंवा हमी देऊ शकत नाही. विदर्भापुरता विचार केल्यास, आपल्याकडे अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन्ही दिशेने वारे वाहतात. वाऱ्याच्या दिशेसोबतच वातावरण बदलते. याला हवामानातील बदल आणि ‘ग्लोबल वॉर्मिंग’ही बऱ्याच प्रमाणात कारणीभूत आहेत. हवामान व पावसाविषयी खरोखरच अचूकता आणायची असेल तर, अद्ययावत यंत्रणा बसविणे गरजेचे आहे. याकडे केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

शेती निसर्गावर आधारित असल्यामुळे आम्हा शेतकऱ्यांना सर्वस्वी हवामान विभाग आणि वर्तमानपत्रातील बातम्यांवर अवलंबून राहावे लागते. मात्र त्यांचे अंदाज किंवा बातम्या कधीकधी दिशाभूल करणाऱ्या ठरतात. त्यामुळे खूप नुकसान होते. हवामानाविषयी अचूक माहिती मिळाल्यास पेरणी व एकूणच शेतीचे नियोजन करता येऊ शकते. सरकारने या दृष्टीने विचार करण्याची गरज आहे.

-सचिन राऊत, शेतकरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT