Microsoft Windows Outage sakal
नागपूर

Microsoft Windows Outage : ब्लू स्क्रीन एरर ने आठ विमाने रद्द; विमानतळावर प्रवाशांची गैरसोय

जगभरातील विमानतळांना सेवा देणाऱ्या सॉफ्टवेअर कंपनीच्या विंडोजवर चालणारे लाखो कम्प्युटर आणि लॅपटॉप शुक्रवारी ब्लू स्क्रीन एररमुळे अचानक क्रॅश झाले.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - जगभरातील विमानतळांना सेवा देणाऱ्या सॉफ्टवेअर कंपनीच्या विंडोजवर चालणारे लाखो कम्प्युटर आणि लॅपटॉप शुक्रवारी ब्लू स्क्रीन एररमुळे अचानक क्रॅश झाले. याचा परिणाम काही विमान कंपन्यांसह बँक, टेलिकॉम कंपन्या, टीव्ही आणि रेडिओ ब्रॉडकास्ट सेवांवर झाला.

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवाशांना मोठा फटका बसला. मुंबई, बंगळूरहून नागपूरला येणाऱ्या आणि येथून दिल्लीसह इतर शहरात जाणारी इंडिगोची विमाने रद्द करण्यात आली. त्यामुळे विदर्भातील प्रवाशांची गैरसोय झाली.

शुक्रवारी मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड झाल्याने जगभरातील वापरकर्त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. भारतीय वेळेनुसार दुपारी १२.३० वा.च्या सुमारास हा बिघाड झाला. यामुळे जगभरात बँकांपासून विमान वाहतुकीपर्यंतच्या सेवा ठप्प झाल्या होत्या. जगभरातील अनेक वापरकर्त्यांच्या विंडो सिस्टिमवर निळ्या रंगाची स्क्रीन दिसू लागले. यामुळे मोठी समस्या निर्माण झाली.

विमान प्रवासाचे बुकिंग आणि चेक-इन सेवा बंद झाल्यामुळे एअर इंडिया, इंडिगो, आकसा एअरलाईन्स आणि स्पाइसजेटची सेवा खंडित झाल्याचे चित्र होते. संगणक प्रणालीच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने इंडिगोने ६ई-६२६५ दिल्ली-नागपूर आणि ६ई-६५७३ नागपूर-दिल्ली, ६ई-८०४ मुंबई- नागपूर, ६ई-८०६ नागपूर-मुंबई, ६ई-४८६ बेंगळुरू-नागपूर, ६ई-६८०३ नागपूर-बेंगळुरू, ६ई-६३७६ दिल्ली-नागपूर आणि ६ई-६३८४ नागपूर-दिल्ली अशा आठ विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली.

भारतात इंडिगो एअरलाईन्स देशांतर्गंत सेवा देणारी सर्वांत मोठी कंपनी आहे. या कंपनीला संगणकीय तांत्रिक बिघाडाचा सर्वाधिक फटका बसला. या शिवाय स्पाइसजेट परवडणाऱ्या एअरलाईन्सलाही तांत्रिक समस्येचा फटका बसला. आमची टीम या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहे, असे स्पाइसजेटकडून सांगण्यात आले.

बँक, टेलिकॉम कंपन्या, टीव्ही, रेडिओ ब्रॉडकास्ट सेवा प्रभावित

विमानतळच नाही तर विविध क्षेत्रातील व्यवसाय, बँक, टेलिकॉम कंपन्या, टीव्ही आणि रेडिओ ब्रॉडकास्ट सेवांना विंडोजच्या ब्लू स्क्रीन एररचा सामना करावा लागला. विंडोजची ऑपरेटिंग सिस्टिम बंद झाल्यामुळे यावर अवलंबून असलेले सर्वच व्यवहार ठप्प झाले. मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रत्येक विमानाला सरासरी ५१ मिनिटांचा उशीर झाला. तर दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुमारे ४० मिनिटांचा विलंब झाला. दरम्यान एअर इंडियाने सांगितले की, मायक्रोसॉफ्टच्या समस्येमुळे त्यांच्या सेवेत तात्पुरत्या काळापुरता व्यत्यय आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT