कोरोनामुळे पालकांची आर्थिक घडी विस्कटली. शाळेचे शुल्क न भरता अनेकांनी शाळाच बदलली.
नागपूर - कोरोनामुळे (Corona) पालकांची आर्थिक घडी विस्कटली. शाळेचे शुल्क (School Fee) न भरता अनेकांनी शाळाच (School) बदलली. शाळेचे शुल्क न भरल्याने बहुतांश शाळांनी विद्यार्थ्यांना (Student) शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र (Certificate) दिलेच नाही. त्यामुळे आता नव्या शाळेत प्रवेश घेतल्यावर या विद्यार्थ्यांची ‘सरल’ या स्टुडण्ट पोर्टलवर (Saral Student Portal) नोंदणी होत नसल्याने हे विद्यार्थी शालेय पोषण आहार, समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पुस्तके व गणवेश या सुविधांपासून वंचित राहणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शाळा सोडल्यावर विद्यार्थ्यांना त्याचे प्रमाणपत्र (टीसी) दिली जाते. ते प्रमाणपत्र ज्या शाळेत प्रवेश घेतो, त्या शाळेत सादर केल्यावर प्रवेश मिळत असतो. मात्र, कोरोनाकाळात बहुतांश शाळांनी शुल्कासाठी मध्येच शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांना पैसे दिल्याशिवाय टीसी न देण्याचे धोरण ठरविले. त्यात बहुतांश इंग्रजी शाळांचा समावेश होता. मात्र, याबाबत राज्य सरकारने शासन निर्णय काढला.
तसेच आरटीईअंतर्गत एक ते आठमध्ये शिकणाऱ्या मुलांची टीसी नसतानाही जन्म प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी वा अनुदानित शाळांमध्ये प्रवेश देण्याचे आदेश दिले. त्यामुळे बहुतांश पालकांनी त्याशिवाय प्रवेश घेतले. आता राज्यात सर्वच शाळेतील विद्यार्थ्यांची नोंदणी ‘सरल’ या स्टुडण्ट पोर्टलवर करण्यात येत आहे.
मात्र, टीसीशिवाय या पोर्टलवर नोंदणी करता येत नसल्याने या विद्यार्थ्यांचे नाव नेमके कोणत्या शाळेत आहे हे कळायला मार्ग नाही. विशेष म्हणजे, नोंदणी न केल्यास सरकारी वा अनुदानित शाळेत असतानाही या विद्यार्थ्यांना त्यातील सोयी-सुविधांचा लाभ मिळणार नसल्याचे दिसून येत आहे. यामध्ये राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांचे ट्रॅकिंग कसे होणार?
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाद्वारे ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळांनी टीसी दिली नाही. याशिवाय या शाळा विद्यार्थ्यांना प्रमोट करील नसल्याने नोंदणी करता येणे शक्य नाही. त्यामुळे त्यांची नोंदणी नव्या शाळेद्वारे होत नसल्याचे दिसून येते. याशिवाय विद्यार्थ्यांचे स्टुडण्ट आयडी आधारला लिंक असल्याने अनेक विद्यार्थी हे दोन्ही शाळेतून आधार क्रमांकाची माहिती सरकारकडे पाठविली जाते. त्यात हे विद्यार्थी दोन्ही शाळेत असल्याचे दिसून येतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे ‘ट्रॅकिंग’ कसे होणार, हा प्रश्न आहे.
सरल नोंदणीमध्ये येणाऱ्या अडचणी लवकर दूर करण्यात येईल. याशिवाय आधारमुळे जे विद्यार्थी दोन शाळेत दिसून येत आहेत. त्याबाबत डाटा मागवून ती समस्या सोडविण्यात येणार आहे.
- विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त, शालेय शिक्षण
अशी आहे जिल्ह्यात ‘सरल’ची स्थिती
१,१७,६९८ - विद्यार्थ्यांची आधार नोंदणी बाकी आहे
९,४८५ - विद्यार्थ्यांची आधार नोंदणी चुकीची आहे
१,३२,७५२ - विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक जुळत नाही
७७,७७१ - विद्यार्थ्यांची नावे जुळत नाहीत
७,१२१ - विद्यार्थ्यांचे जेंडर जुळत नाहीत
२३,४७६ - विद्यार्थ्यांची जन्मतारीख जुळत नाही
१३,७५९ - विद्यार्थ्यांचे नाव आणि जेंडर जुळत नाही
२,९६१ - विद्यार्थ्यांचे नाव आणि जन्मतारीख जुळत नाही
८०४ - विद्यार्थ्यांचे जेंडर व जन्मतारीख जुळत नाही
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.