Nagpur  sakal
नागपूर

Nagpur : मनपा शाळेत ‘मिशन नवचेतना’घडणार विद्यार्थ्यांचे आयुष्य ;सुशोभीकरण, डिजिटलायजेशन होणार

महानगरपालिकेच्या शाळेत गरीब व गरजू विद्यार्थी शिक्षण घेतात. दिवसातील ६ ते ८ तास हे विद्यार्थी शाळेच्या परिसरात असतात. या विद्यार्थ्यांच्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण व्हावी, यासाठी मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनात ‘मिशन नवचेतना’ची सुरुवात करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महानगरपालिकेच्या शाळेत गरीब व गरजू विद्यार्थी शिक्षण घेतात. दिवसातील ६ ते ८ तास हे विद्यार्थी शाळेच्या परिसरात असतात. या विद्यार्थ्यांच्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण व्हावी, यासाठी मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनात ‘मिशन नवचेतना’ची सुरुवात करण्यात आली आहे. मनपा शाळांचे सप्टेंबर २०२३ मध्ये सखोल सर्वेक्षण करण्यात येऊन विकासाचे तीन टप्पे निश्चित करण्यात आले आहेत.

त्यानुसार, २०० पेक्षा जास्त पटसंख्या असणाऱ्या २३ शाळांमध्ये दुरुस्ती व सुशोभीकरण करण्याकरिता ४ कोटी ६८ लाख रुपयांचा निधी डीपीडीसीमार्फत देण्यात येईल. त्यामुळे नवीन सत्रात मुलांना सुंदर, प्रफुल्लित व सुसज्ज शाळा मिळणार आहेत. सर्व शाळांमध्ये इलेक्ट्रिफिकेशन व आवश्यक सुविधांच्या नूतनीकरणासाठी १ कोटी १२ लाख रुपये मंजूर करून काम सुरू झाले आहे. तसेच २३ शाळांतील १२८ खोल्या डिजिटल व ७ शाळांमध्ये संगणक लॅब तयार करण्यात येणार आहे. शिक्षकांद्वारे ‘डिजिटल बोर्ड’च्या वापरामुळे विद्यार्थ्यांना परस्परसंवाद पद्धतीने नियमित शालेय विषय शिकता येतील. याकरिता ४ कोटी ८९ लाख रुपये इतका निधी मान्य करण्यात आलेला आहे.

तसेच सीएसआरद्वारे बोलक्या भिंती तयार करण्याचे नियोजित असल्याचे मनपा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. मनपाद्वारे ८८ प्राथमिक व २८ माध्यमिक अशा एकूण ११६ शाळांचे संचालन करण्यात येत आहे. पालकांनी पाल्यांचे नाव नोंदवून मोफत शिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्तांनी केले.

मनपा शाळेत विकासाचे नियोजन

  • क्रीडा, संगीत व संगणक लॅब शिक्षकांची नियुक्ती

  • विद्यार्थ्यांची वर्षातून दोन वेळा आरोग्य तपासणी

  • मुलींच्या उपस्थितीकरिता प्रोत्साहन भत्ता व किमी नुसार सायकल उपलब्ध

  • विज्ञान प्रयोगशाळा आधुनिक करण्यात येणार

  • हँगिंग लायब्ररी व स्वतंत्र लायब्ररी कक्ष तयार करण्यात येईल

  • शिक्षणोत्सवाच्या माध्यमातून मेगा पालक मेळावा होईल

  • आनंददायी शिक्षणासाठी ‘दप्तराविना शाळा’ उपक्रम राबविण्यात येणार

  • विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक समुपदेशनाची सोय

  • शाळेतील २ हजार १४९ बालवाडी विद्यार्थ्यांना पोषक आहार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vadgaon Sheri Assembly Election 2024 Result Live: वडगाव शेरी मतदारसंघात तुतारी वाजली; बापू पठारेंचा 5000 मतांनी विजयी

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे यांच्या पराभवाची ५ कारणं; दोघांचं भांडण, महेश सावंतांचा लाभ

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: एकनाथ शिंदेंनी शब्द खरा करून दाखवला, विधानसभेतील 'ते' भाषण व्हायरल

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: माळशिरसात सातपुते २०७५ मतांनी पिछाडीवर

SCROLL FOR NEXT