नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे(Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University) ‘एमकेसीएल’ला (MKCL) प्रथम वर्षाच्या परीक्षा (first year exam)आणि नोंदणीची जबाबदारी देण्यात आली. मात्र, विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या महाविद्यालयांनी विरोध केला. त्यामुळे अद्यापही एमकेसीएलकडे नोंदणी सुरुच आहे. त्यातून प्रथम वर्षाच्या परीक्षा केव्हा घेणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे.
विद्यापीठाद्वारे एमकेसीएलला परीक्षेच्या कामाची जबाबदारी दिली. त्यानुसार प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा परीक्षा आणि नोंदणी करण्यास सुरुवात केली. त्यानुसार कंपनीला विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी डाटा हवा आहे. त्यासाठी एमकेसीएलद्वारे महाविद्यालयांना प्रवेशित विद्यार्थ्यांची नव्या पोर्टलवर फेरनोंदणी करण्याचे पत्र पाठविण्यात आले. मात्र, विद्यापीठातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश उरकले. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परत नोंदणी करण्याचे आदेश विद्यापीठाद्वारे देण्यात आले. मात्र, या विरोधात प्राचार्यांनी बंड पुकारले आणि फेरनोंदणीस नकार दिला. मात्र, विद्यापीठाने एमकेसीएलच्या मागे उभे राहीले. त्यामुळे महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची नोंदणी करणे अनिवार्य झाले.
मात्र, ज्या विद्यार्थ्यांनी अगोदरच नोंदणी केली, त्यांच्या प्रवेशाच्या निश्चितीचा मेल विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या अकाउंटमध्ये जातो. त्यामुळे फेरनोंदणीसाठी हा क्रमांक असणे आवश्यक आहे. सध्या ५० टक्के विद्यार्थी महाविद्यालयात येत नाही. याशिवाय ग्रामीण भागात असलेले विद्यार्थी हे एस.टी. बंद असल्याने महाविद्यालयात येत नाही. अनेक विद्यार्थ्यांनी नेमके कोणते पासवर्ड टाकले तेही त्यांना माहिती नाही.
एमकेसीएलमुळे लांबणार प्रथम वर्षाच्या परीक्षा
त्यामुळे फेरनोंदणी करायची कशी हा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे फेरनोंदणीसाठी बराच उशिर लागतो आहे. विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये तृतीय वर्षांच्या परीक्षा दुसऱ्या टप्प्यात घेण्यात येत आहे. तिसरा टप्पा २ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. मात्र, या प्रकाराने पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षांच्या परीक्षआ कधी होतील याबाबत प्रशासनाकडे अद्याप कुठलीही माहिती नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान याबाबत परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांचेशी संपर्क केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.