bhavana gawali krupal tumane and parinay fuke  Sakal
नागपूर

MLC Polls 2024 : मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला; भावना गवळी, फुके, तुमाने विधानपरिषदेत

अनिल यादव

Nagpur News : ‘माझ्या सोबत आलेल्या प्रत्येक आमदार आणि खासदाराला पुन्हा निवडून आणण्याची जबाबदारी माझी आहे’, अशी हमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. विदर्भातून वाशीम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी आणि रामटेकचे खासदार याचे तिकीट कापण्यात आले होते.

मात्र, या दोघांनाही विधान परिषदेवर संधी देऊन मुख्यमंत्र्यांनी राजकीय पुनर्वसन करण्याचा शब्द पाळला आहे. विधान परिषदेच्या ११ जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले आणि निकालही लागला. संख्याबळ पाहता अपेक्षेनुसार महायुतीचे ९ उमेदवार सहज विजयी झाले. यामध्ये विदर्भातील भावना गवळी, कृपाल तुमाने आणि परिणय फुके यांचा समावेश आहे.

या तिघांच्या विजयाने विधान परिषदेत विदर्भाचा आवाज बुलंद झाला आहे. भावना गवळी आणि तुमाने हे संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचे प्रतिनिधी होते. या विजयानंतर हे दोन्ही नेते आता महाराष्ट्र विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाचे सदस्य झाले आहेत.

भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांच्या विजयाची संधी नसल्याच्या भारतीय जनता पक्षाच्या अहवालानंतर शिवसेनेने या दोघांनाही उमेदवारी दिली नव्हती. दोघांनीही पक्षाच्या नव्हे तर भाजपच्या विरोधात थेट नाराजी व्यक्त केली होती. ‘मला जर तिकीट मिळाले असते तर यवतमाळ-वाशिममधून विजयी झाले असते’ असे वक्तव्यही त्यांनी केले होते.

इकडे कृपाल तुमाने यांनीही तिकीट कापण्यास भाजपचा अहवाल कारणीभूत ठरल्याचा थेट आरोप केला होता. मात्र, दोघांनीही थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली नव्हती. विद्यमान खासदारांचे तिकीट कापल्याने कार्यकर्तेही नाराज झाले होते. या नाराजीचा फटकाही पक्षाला निवडणुकीत बसला.

मात्र, दोघांचाही भविष्यात पक्ष सकारात्मक विचार करेल, वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिल्याची चर्चा होती. याबाबत मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे काहीच सांगितले नव्हते. पण, विधानपरिषद निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर शिवसेनेने भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना उमेदवारी दिली. त्यामुळे राजकीय पुनर्वसन करण्याचे दिलेले आश्वासन पक्षप्रमुखाने पाळल्याचे स्पष्ट झाले.

वाशीममध्ये जल्लोष

भावना गवळी विजयी झाल्याची बातमी येताच शिवसैनिकांनी शहरात विजयाचा जल्लोष केला.उमेदवारी नाकारल्याने भावना गवळी नाराज होत्या. सेनेचे जिल्हयातील कार्यकर्तेही नाराज होते. मात्र परिषद निवडणुकीत गवळी यांचा विजय झाल्याने शिंदे सेनेने शहरात विजयाचा जल्लोष केला.

येथील पाटणी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्याची आतीषबाजी करून मिठाई वाटण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख महादेव ठाकरे, विजय खांझोडे यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

भावना गवळी विदर्भातील शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्या आहेत. लोकसभा निवडणुकीत पाचवेळा विजयी झाल्या आहेत. कृपाल तुमानेही दोनवेळा खासदार होते. या दोन्ही नेत्यांवर आता विदर्भात पक्षाला मजबुती देण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. दोन महिन्यांनंतर विधानसभा निवडणूक होणार असल्याने भावना गवळी आणि तुमाने यांचा कस लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT