नागपूर - मुंबईतील एमएमआरडीए अधिकाऱ्यांनी केलेल्या गैरव्यवहार प्रकरणी काय कारवाई केली, असा प्रश्न आज भाजपचे विधानपरिषदेतील गटनेते प्रविण दरेकर यांनी आज विधानपरिषदेत उपस्थित केला.
या गैरव्यवहाराबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तक्रारपत्र दाखल केले होता. मात्र नंतर त्यांनी ते पत्र मागे घेतले. त्यांच्या पत्रावर शासनाने काय कारवाई केली? ती पत्रे कुठे आहेत ? असे प्रश्नही दरेकर यांनी केले.
मुंबईच्या एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांच्या गैरव्यवहाराचा हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. अधीक्षक अभियंतांनी सबवे लेअरची कामे केलेली नसली तरी उड्डाणपुलाच्या प्रत्येक पाईल फाउंडेशनच्या खोलीत पाच मीटर जास्त खोली दाखवून अधिकाऱ्यांनी कंत्राटदारासोबत भागीदारी करून देयके मंजूर केली. अशा प्रकारे ६०० कोटी एवढा गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे.
यासंदर्भात चौकशी सुरू झाल्यानंतर आयुक्तांनी त्यांचे अधिकार काढून घेतले होते. परंतु नंतर आयुक्तांची बदली झाल्याने प्रमुख अभियंत्याने पुन्हा ते अधिकार परत दिले. २२ सप्टेंबर २०२२ रोजी सभागृहाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबत तक्रार केली होती. नंतर २३ ऑक्टोबरला ही तक्रार मागे घेण्यात आली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही तक्रार केली होती. ती तक्रार त्यांनीही मागे घेतली.
मात्र यासंदर्भातील चौकशी कुठपर्यंत आली, या अधिकाऱ्यांवर काय कारवाई झाली, तसेच विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी दिलेले पत्र कुठे आहे? त्या पत्रांमधील मुद्द्याबाबत काय कारवाई झाली? असे प्रश्नही दरेकर यांनी विचारले.
या तक्रारींबाबत आयआयटी कडून चौकशी सुरू आहे. दानवे आणि आठवले यांनी जरी कारवाईची पत्रे मागे घेतली असली तरी सरकार आयटी मार्फत चौकशी करत आहे. चौकशीत कोणी दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या चर्चेदरम्यान दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.