ST Bus started in nagpur esakal
नागपूर

नागपूर : चार मार्गांवर आजपासून लालपरी ‘नॉनस्टॉप’

अमरावती, चंद्रपूर, भंडारा, वर्धेला जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्य परिवहन महामंडळातर्फे(msrtc) एसटीची सेवा पुर्ववत करण्याचे आटोकाट प्रयत्न सुरु आहे. याचाच एक भाग म्हणजे उद्या (ता. १४) पासून विदर्भातील चार मार्गांवर ‘एसटी नॉनस्टॉप’ धावणार आहे. यामध्ये, अमरावती, चंद्रपूर, भंडारा आणि वर्धा शहरांचा समावेश आहे. तर, प्रवाशांची वर्दळ असलेल्या काही प्रमुख मार्गांवर दिवसातून किमान चार फेऱ्या सुरु करण्यात येत आहेत.८ ऑक्टोबरपासून कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. याचा एक भाग म्हणून नागपूर विभागातील एकूण २ हजार ३७७ कर्मचारी मागण्यांवर अडून बसले. त्यानंतर नागपूर विभागातील ५५७ कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. (Action was taken against 557 employees of Nagpur division)

मार्ग वारंवारिता

  1. अमरावती - १ तास (सकाळी ६ ते सायं ७ वाजतापर्यंत)

  2. चंद्रपूर -१ तास (सकाळी ६ ते सायं ७ वाजतापर्यंत)

  3. भंडारा - अर्धा तास (सकाळी ६ ते सायं ७ वाजतापर्यंत)

  4. वर्धा - १ तास (सकाळी ६ ते सायं ७ वाजतापर्यंत)

  5. रामटेक -२ तास (सकाळी ८ ते सायं ६ वाजतापर्यंत)

  6. सावनेर -२ तास (सकाळी ८ ते सायं ६ वाजतापर्यंत)

  7. उमरेड -२ तास (सकाळी ८ ते सायं ६ वाजतापर्यंत)

  8. काटोल -२ तास (सकाळी ८ ते सायं ६ वाजतापर्यंत)

प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून ५ जानेवारीपासून खासगी चालक व वाहकांची भरती करण्यासाठी खासगी एजन्सीची(private agency) नेमणूक करण्यात आली. या एजन्सीच्या माध्यमातून आजवर ४४ चालकांना सेवेमध्ये रुजू करून घेण्यात आले आहे. तर, परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या तंबीनंतर ६५१ कर्मचारी कामावर हजर झाले. याशिवाय निवृत्त चालक, वाहकांना विभागातर्फे वीस हजार मासिक वेतनाच्या बदल्यात कंत्राटी पद्धतीने कामावर येण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार, दहा निवृत्त कर्मचाऱ्यांनी अर्ज केला होता.

चार मार्गावर आजपासून ‘नॉनस्टॉप’

यातील निकषांमध्ये बसणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना आजपासून कामावर रुजू करून घेण्यात आले. या कर्मचाऱ्यांच्या जोरावर नागपूर विभागातील एसटीची(nagpur division bus depo) सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. तसेच, काही प्रमुख मार्गांवर दिवसभरातून किमान चार फेऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये, यवतमाळ(yavatmal), गडचिरोली, गोंदिया, साकोली, देवरी, हिंगणघाट, पांढरकवडा, वरुड, मोर्शी या गावांचा समावेश आहे. एसटीच्या(msrtc) आज एकूण ६३ फेऱ्या झाल्या असून सहा कर्मचारी कामावर रुजू झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT