mumbai howrah train accident jharkhand 10 trains cancelled at nagpur railway station sakal
नागपूर

Nagpur : हावडा-मुंबई एक्स्प्रेसच्या अपघातामुळे 10 गाड्या रद्द; नागपूरमार्गावरील रेल्वे प्रवाशांना बसला फटका

सकाळ वृत्तसेवा

Nagpur News : झारखंडच्या चक्रधरपूर रेल्वे मंडळच्या बाराबम्बो रेल्वे स्टेशनजवळ गाडी क्रमांक १२८१० हावडा-मुंबई एक्स्प्रेसचे १८ डबे रुळावरून घसरले. यात २ प्रवाशांचा मृत्यू तर २० प्रवासी जखमी झाले. मंगळवारी पहाटे ३:४५ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. त्यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या दहा गाड्या रद्द करण्यात आल्या. तर काहींच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.

वाहतूक सेवेवर परिणाम झाल्याने नागपूरमार्गे धावणाऱ्या दहा गाड्या ३० ते ३१ जुलै दरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत. तर ११ गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. नागपूरमार्गे धावणारी गाडी क्रमांक १२१०१ एलटीटी-शालीमार ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस मंगळवारी (ता.३० जुलै) रोजी रद्द करण्यात आली. त्याचप्रमाणे १२१३० हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस, २२९०६ शालीमार-ओखा एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.

यासह १८१०९ टाटानगर-नेताजी सुभाषचंद्र बोस (इतवारी) एक्स्प्रेस, १८०३० शालीमार-एलटीटी (लोकमान्य टिळक टर्मिनस) एक्स्प्रेसह सुद्धा ३० जुलै रोजी रद्द करण्यात आली आहे. तसेच बुधवारी (ता. ३१ जुलै) रोजी १८११० नेताजी सुभाषचंद्र बोस (इतवारी)-टाटानगर एक्स्प्रेस, १२२६२ हावडा-मुबई दुरंतो एक्स्प्रेस,

१८०३० शालीमार-एलटीटी एक्स्प्रेस, १२७६८ संतरागाछी- नांदेड एक्स्प्रेस आणि १८१०९ टाटानगर-नेताजी सुभाषचंद्र बोस (इतवारी) एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. यासह तब्बल ११ गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसला. नागपूर मुख्य रेल्वे स्थानकावर प्रवाशांना प्रतीक्षालयात ताटकळत राहावे लागले.

नागपूर-वर्धा थर्ड लाईनच्या कामामुळे दहा रेल्वे रद्द

तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गाच्या कामासाठी सेलू रोड स्टेशनवरील यार्डमध्ये ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे ३१ जुलै ते ११ ऑगस्ट दरम्यान विविध दिवशी मेमू व एक्स्प्रेस अशा एकूण १० रेल्वेगाड्या रद्द करण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०१३७३ वर्धा-नागपूर मेमू ३१ जुलै आणि १, २, ४, ५ व ९ ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आली आहे. तसेच ०१३७४ नागपूर-वर्धा मेमू १, २, ३, ५, ६, ७ व १० ऑगस्टला धावणार नाही. गाडी क्रमांक १२११९ अमरावती-अजनी एक्स्प्रेस आणि १२१२० अजनी अमरावती एक्स्प्रेस १, २, ३, ५, ६, १० व ११ ऑगस्टला रद्द करण्यात आली आहे.

गाडी क्रमांक १२१५९ अमरावती-जबलपूर एक्स्प्रेस ४, ५, ९ १० ऑगस्टला आणि १२१६० जबलपूर-अमरावती एक्स्प्रेस ५, ६, १० व ११ ऑगस्टला रद्द करण्यात आली आहे. यासह २२१२४ अजनी-पुणे एक्स्प्रेस ६ ऑगस्टला, २२१४१ पुणे-नागपूर एक्स्प्रेस ८ ऑगस्टला, २२१४२ नागपूर-पुणे एक्स्प्रेस ९ ऑगस्टला आणि २२१४० अजनी-पुणे एक्स्प्रेस ११ ऑगस्टला रद्द करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satyapal Malik: "अंबानींची फाईल माझ्याकडं सहीसाठी आली होती, पण..."; सत्यपाल मलिकांचा खळबळजनक खुलासा

...नाहीतर हातपाय तोडू, पाकिस्तानी चित्रपट 'द लिजेंड ऑफ मौला जट' विरोधात MNS आक्रमक, थेट धमकीच दिली

Dharavi Mosque: धारावी मशीद प्रकरण; बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी समितीला 8 दिवसांची मुदत, अन्यथा...

Zero to hero! शुभमन गिलने भारी पराक्रम नोंदवला, आपला Rishabh Pant ही विक्रमाच्या बाबतीत मागे नाही राहिला

Mumbai University Senate Election : उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक उद्याच होणार

SCROLL FOR NEXT