Cat Bite Death Esakal
नागपूर

Death Due to Cat Bite: मांजरीने चावल्याने अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू, शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक खुलासा

मित्रांसमवेत खेळत असताना मांजरीने चावा घेतल्यानंतर अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. श्रेयान्शू क्रिष्णा पेंदाम, असे या मुलाचे नाव आहे.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur 11 Year old Boy Died due to Cat Bite: मित्रांसमवेत खेळत असताना मांजरीने चावा घेतल्यानंतर अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. श्रेयान्शू क्रिष्णा पेंदाम, असे या मुलाचे नाव आहे.


तालुक्यातील उखळी गावात श्रेयान्शू हा शनिवारी(ता.९) सायंकाळच्या सुमारास मित्रांसोबत खेळत होता. खेळता खेळता तेथे आलेल्या मांजरीने अचानक त्याच्यावर हल्ला करून त्यांच्या पायाला चावा घेतला. चावा घेतल्यानंतर श्रेयान्शू घरी आला आणि घडलेला प्रकार आईला सांगितला. .

काही वेळानंतर त्याला मळमळ झाली आणि उलट्या सुरू झाल्या. आई-वडिल त्याला लता मंगेशकर रुग्णालयात घेऊन आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. तेथून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी एम्स रुग्णालयात हलविण्यात आला. हिंगणा पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून उत्तरीय तपासणी अहवाल आल्यावर मृत्यू नेमका कशामुळे झाला हे कळू शकेल,असे पोलिस विभागाकडून सांगण्यात आले. (Latest Marathi News)

दुर्मीळ घटना
मांजरीने चावा घेतल्याने मृत्यू होण्याची ही दुर्मीळ घटना आहे. मांजरीचा हल्ला आणि चावा घेतल्यानंतर श्रेयांशू घाबरला आणि त्याला उलट्या सुरू झाल्या. उलटी बाहेर न येता घशातून श्वसन नलिकेत जाऊन श्वास रोखल्याने हृदयघात झाला असावा किंवा आणखी कोणत्या तरी विषारी श्वापदाने दंश केला असावा.

पायाला जखम होणे किरकोळ असले तरी महत्त्वाच्या अवयवाच्या रक्तवाहिनीला इजा झाल्याने मृत्यू होऊ शकतो. नेमका मृत्यू कशामुळे झाला हे आताच सांगणे कठीण आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यावर निश्चित कारण समोर येईल, असे हिंगणा तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पडवे म्हणाले. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

BJP With Mns: शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना भाजपचे समर्थन, आशीष शेलारांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT